एक वेळ अशी होती जेव्हा ऋषि कपूर आणि त्याच्या बु...

एक वेळ अशी होती जेव्हा ऋषि कपूर आणि त्याच्या बुटांवर दाऊद इब्राहिम फिदा होता… स्वतः ऋषि कपूरने आपल्या पुस्तकात केलाय याचा उल्लेख (When Underworld Don Dawood Ibrahim Was A Fan Of Rishi Kapoor And His Shoes, The Actor Had Revealed This In His Book)

बॉलिवूडचे लिजेंड चॉकलेट हिरो ऋषि कपूर आज आपल्यात नसले तरी त्यांचा अभिनय आणि त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून ते सदैव चाहत्यांच्या मनात जिवंत राहतील . काहीच दिवसांपूर्वी त्यांचा ‘शर्माजी नमकीन’ हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपटामुळे चाहत्यांच्या त्यांच्याबद्दलच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या असून त्यांना पडद्यावर पाहून लोक भावुक होत आहेत. दरम्यान ऋषी कपूर आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित एक किस्सा आपण जाणून घेणार आहोत.

ऋषि कपूर यांच्या चाहत्यांमध्ये सामान्य तसेच काही खास व्यक्तीही होत्या. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा देखील चिंटू अर्थात ऋषी कपूर यांचा बेहद मोठा फॅन होता. विशेषतः ऋषी कपूर यांच्या बुटांचा तर तो दिवाना होता. असा उल्लेख चिंटू ने आपल्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्रात केला आहे.

ऋषी कपूर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात दाऊदसोबतच्या भेटीचा आवर्जुन उल्लेख केला असून दोघांची भेट दुबईत झाल्याचेही त्याने सांगितले होते. एकदा ऋषी कपूर दुबईतील एका मॉलमध्ये नीतू कपूरसोबत फिरत असताना तिथे दाऊदची त्यांना टक्कर लागली. त्यावेळी तो आपल्या ८ ते १० अंगरक्षकांसह मॉलमध्ये उपस्थित होता.

यानंतर दाऊदचे चहाचे आमंत्रण स्वीकारून एकदा ऋषी कपूर दाऊदला भेटायला त्यांच्या घरी गेला. त्यावेळेस दाऊदने, तो दारू पीत नाही आणि सर्व्हही करत नाही, असे म्हटले होते. म्हणून तो त्यांना चहापाणी देत असल्याच त्याने म्हटले आहे. या भेटीत ऋषी कपूर यांनी दाऊदसोबत तब्बल ४ तास घालवले. चहासोबत चित्रपटांव्यतिरिक्त इतरही अनेक विषयांवर ते बोलले. या भेटीत दाऊदने त्याला इंडस्ट्रीतील कोणते कलाकार आवडतात हे देखील सांगितले होते.

दिवंगत कलाकार ऋषि कपूरचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदलाही कसे वेड होते हे सांगणारा हा किस्सा. असे अनेक किस्से ‘शर्माजी नमकीन’ च्या प्रदर्शनानंतर चाहत्यांना भावुक करत आहेत.