कॉमेडी क्वीनच्या जीवनाची ट्रॅजेडी, भारती सिंगव...

कॉमेडी क्वीनच्या जीवनाची ट्रॅजेडी, भारती सिंगवर वयाच्या दुसऱ्या वर्षी कोसळला होता दुखा:चा डोंगर(When Two Year Old Bharti Had To Face Such A Big Sorrow)(When Two Year Old Bharti Had To Face Such A Big Sorrow)

आपल्या विनोदाने प्रत्येकाच्या मनावर राज्य करणाऱ्या भारती सिंगला संपत्ती असो वा प्रसिद्धी कशाची कमी नाही. पण असं म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात, त्याचप्रमाणे भारतीचेही आयुष्य साध सोप्प नव्हतं. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या भारतीचे आधीचे दिवस हलाखीत गेले. भारती 2 वर्षांची असताना तिच्यावर आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

भारती एका मध्यमवर्गीय कुटुंबात मोठी झाली. ती फक्त 2 वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले, त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्या आईवर आली. अचानक डोक्यावरचे वडीलांचे छप्पर गेल्यामुळे भारती आणि तिचे कुटुंब गरीबीच्या दलदलीत अडकू लागले. एकदा एका मुलाखतीत भारती सिंगने सांगितले होते की, तिने लहानपणी खूप गरीबी पाहिली होती. वडिलांच्या निधनानंतर अनेकदा आम्ही उपाशी पोटी किंवा मीठ-भाकरी खाऊन दिवस काढले होते.

भारती 2 वर्षांची असतानाच तिच्या वडीलांचे निधन झाल्यामुळे तिला आपल्या वडीलांचा चेहरा देखील आठवत नसल्याचे तिने सांगितले. भारती पुढे म्हणाली की, माझ्या भावडांना थोडे तरी वडीलांचे प्रेम मिळाले होते. पण माझ्या नशीबात तेही नव्हते. त्यामुळे मी घरात त्यांचा फोटोही लावू देत नाही कारण तो पाहिल्यावर मला खूप त्रास होतो.

वडीलांच्या निधनानंतर तिन्ही मुलांची सर्व जबाबदारी आईवर पडल्याचे भारतीने सांगितले. त्यावेळी तिची आई 24 वर्षांची होती. एवढ्या कमी वयात पतीच्या निधनामुळे भारतीची आई खचून गेली होती. शिवाय त्यांच्याकडे घर चालवण्याचे कोणतेही साधन सुद्धा नव्हते.

वडीलांच्या निधनानंतर ज्या लोकांनी आम्हाला कर्ज दिले होते ते घरी येऊन आईला त्रास द्यायचे, तिच्याशी गैरवर्तन करायचे. कधी हात धरायचे तर कधी खांद्यावर हात ठेवायचे. ते असे का करायचे ते तेव्हा मला समजले नाही. तेव्हा आई त्यांच्यांवर जोरात ओरडायची, शिव्या घालायची. मला लहान मुलं आहेत त्यांच्यासमोर तू असे गैरवर्तन करु नकोस असं सारखं त्यांना म्हणायची.

याच मुलाखतीदरम्यान भारती सिंगने असेही सांगितले होते की ती राष्ट्रीय स्तरावरील रायफल शूटर आहे आणि ती पंजाबकडून खेळायची. त्यासाठी तिला दिवसाला १५ रुपये मिळायचे आणि ५ रुपयांचे सरबताचे तीन कूपन्सही मिळायचे. त्या तीन कूपनपैकी भारती दोन कूपन जपून ठेवायची आणि महिन्याच्या शेवटी आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी त्या कूपनमधून सरबत किंवा फळं आपल्या घरी घेऊन जायची.

आजच्या काळात भारतीने आपली सर्व स्वप्ने सत्यात साकार केली आहेत. तिला एक भाऊ आणि बहिण आहे. ते अमृतसरमध्येच राहतात.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम