बॉलिवूड कलाकारांबद्दलच्या या अफवा लोकांना वाटल्...

बॉलिवूड कलाकारांबद्दलच्या या अफवा लोकांना वाटल्या होत्या खऱ्या(When These Rumors Related to Bollywood Stars Made Headlines, Fans also Accepted False News as True)

बॉलिवूडमध्ये रोज कोणत्या ना कोणत्या कलाकारांच्या चर्चा होत असतात. ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये प्रेम, अफेअर्स आणि ब्रेकअपसारख्या बातम्या आता खूप सामान्य झाल्या आहेत. या सगळ्यामध्ये कलाकारांशी संबंधित अशा अनेक बातम्या ऐकायला मिळतात, त्यांचा सत्याशी काहीही संबंध नसतो, असे असूनही अनेक वेळा चाहते या बातम्यांवर विश्वास ठेवतात. बॉलिवूडच्या अनेक टॉप कलाकारांशी संबंधित अशा अनेक अफवा ऐकण्यात आल्या आहेत, ज्या नंतर खोट्या ठरल्या, पण जेव्हा या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, तेव्हा चाहत्यांनी त्यावर विश्वास ठेवला होता.

आलिया भट्ट

बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली आलिया भट्ट सध्या आपल्या गरोदरपणाचा आनंद घेत आहे. याशिवाय आलिया अनेक कारणांमुळे चर्चेत असते, पण जेव्हा तिने इंडस्ट्रीत प्रवेश केला होता तेव्हा ती महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांची मुलगी आहे  अशी अफवा पसरली होती.

करीना कपूर

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. शाहिद कपूरला डेट करण्यापासून ते सैफ अली खानची बेगम साहिबा बनण्यापर्यंत, करीनाने अनेकदा चर्चेत होती. पण मध्यंतरी तिच्याबद्दल असे म्हटले जात होते की, ती नववीत असताना प्रेग्नंट होती. पण ही एक अफवा होती.

करण जोहर आणि सिद्धार्थ मल्होत्रा

बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरचा कोणत्याना कोणत्या वादाशी संबंध असतो, मध्यंतरी करण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्याबाबत अशी अफवा पसरली की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटाच्या रिलीजपूर्वी करण जोहर आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा मीडियात पसरल्या होत्या.

सोनाक्षी सिन्हा

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांची प्रेमकहाणी एकेकाळी चांगलीच चर्चेत होती, पण नंतर दोघेही वेगळे झाले. नंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी दुसरीशीच लग्न केले. पुढे सोनाक्षीचा जन्म झाला. पण सोनाक्षी सिन्हा ही शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांची मुलगी असल्याची अफवा सर्वत्र पसरली होती.

अजय देवगण आणि काजोल

अजय देवगण आणि काजोलला इंडस्ट्रीतील आदर्श जोडपे मानले जाते. पण मध्यंतरी अजयचे त्याच्या सेक्रेटरीशी अफेअर असल्यामुळे काजोलने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याच्या अफवा पसरल्या होत्या.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम