टेलिव्हिजनवरील या कलाकारांनी आपल्या कुटुंबासाठी...

टेलिव्हिजनवरील या कलाकारांनी आपल्या कुटुंबासाठी अभिनयातील कारकीर्द संपवली (When These Famous Stars of TV Said Goodbye to Their Acting Career for The Family)

मोठ्या पडद्यावरील कलाकारांप्रमाणेच छोट्या पडद्यावरील कलाकारही अतिशय लोकप्रिय असतात. टीव्ही मालिकांमध्ये दिसणारे अनेक प्रसिद्ध स्टार्स त्यांच्या खऱ्या नावाऐवजी त्यांच्या पात्राच्या नावाने ओळखले जातात. टीव्हीच्या सर्व स्टार्समध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला अलविदा केले आहे, असे असूनही लोक त्यांना पडद्यावर पाहण्याची प्रतीक्षा करत आहेत. या लेखात, टीव्हीवरील अशा यशस्वी ठरलेल्या अभिनेते आणि अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी कुटुंबासाठी आपल्या अभिनय कारकिर्दीला अलविदा केला आहे.

दिशा वकानी

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील दयाबेनची भूमिका करणारी दिशा वकानी तिच्या गरोदरपणापासूनच शोमध्ये अनुपस्थित आहे. २०१७ मध्ये, तिने आपल्या मुलावर आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्यासाठी शोमधून ब्रेक घेतला आणि अद्याप ती पडद्यावर परतली नाही. मात्र, चाहते अजूनही दयाबेन पुन्हा पडद्यावर येण्याची वाट पाहत आहेत.

सौम्या टंडन

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

‘भाभी जी घर पर हैं’मध्ये गोरी मेमची भूमिका साकारून लोकांची मने जिंकणारी सौम्या टंडनही बऱ्याच दिवसांपासून पडद्यावरून गायब आहे. वास्तविक, सौम्या तिच्या मुलाच्या जन्मापासून शोमध्ये परतली नाही. जेव्हा तिची कारकीर्द यशोशिखरावर होती तेव्हाच तिने कुटुंबासाठी या शोला अलविदा केले आहे.

अनस रशीद

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

‘दिया और बाती हम’ या टीव्ही मालिकेत मुख्य भूमिका साकारून नाव आणि प्रसिद्धी मिळवणारा अभिनेता अनस रशीद याने अभिनय जगतापासून स्वतःला लांब केले आहे. २०१७ मध्ये लग्न झाल्यानंतर तो अभिनयापासून दूर गेला अन्‌ सध्या कुटुंबात पूर्णपणे रमला आहे.

अदिति शिरवाइकर

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

टीव्ही अभिनेता मोहित मलिकची पत्नी आणि अभिनेत्री अदिती शिरवाइकरने लग्नानंतर कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिच्या अभिनय कारकिर्दीला बायबाय केले. लग्नाच्या दहा वर्षांनी ही अभिनेत्री आई झाली आणि सध्या ती मातृत्वाचा टप्पा एन्जॉय करत आहे.

अर्जुन पुंज

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

टीव्हीचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अर्जुन पुंजने त्याची सह-अभिनेत्री गुरदीप कोहलीशी लग्न केले, पण लग्नानंतर त्याने अभिनयाला अलविदा केला. लग्नानंतर तो पत्नीसह गोव्यात स्थायिक झाला, सध्या त्यांची गोव्यात दोन रेस्टॉरंट आहेत.

एकता कौल

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता सुमीत व्यासची पत्नी आणि अभिनेत्री एकता कौलनेही लग्नानंतर तिच्या कुटुंबासाठी अभिनय करिअर सोडले. ‘मेरे अंगने में’मध्ये दिसलेली एकता कौल सध्या एका मुलाची आई आहे आणि ती तिचं मातृत्व एन्जॉय करत आहे.

मिहिका वर्मा

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

‘ये है मोहब्बतें’मध्ये दिव्यांका त्रिपाठीची धाकटी बहीण मिहिकाच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री मिहिका वर्मानेही टीव्ही इंडस्ट्रीला रामराम ठोकला आहे. एका एनआरआयशी लग्न केल्यानंतर मिहिका अमेरिकेत शिफ्ट झाली आहे आणि तिचे कौटुंबिक जीवन एन्जॉय करत आहे.

कांची कौल

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कुमकुम भाग्य’ मधील मुख्य अभिनेता शब्बीर अहलुवालियाची पत्नी कांची कौल ही देखील व्यवसायाने अभिनेत्री आहे, परंतु २०१४ मध्ये एका मुलाला जन्म दिल्यानंतर तिने तिचे संपूर्ण लक्ष तिच्या कुटुंबावर केंद्रित केले आणि तिने टीव्ही इंडस्ट्रीला अलविदा केले.