बिगबॉसच्या घरात या कलाकारांनी दाखवला होता सलमान...

बिगबॉसच्या घरात या कलाकारांनी दाखवला होता सलमान खानला माज, भाईजानने दाखवला त्याचा इंगा (When These Contestants showed Attitude to Salman Khan in Bigg Boss, Actor took Their Class)

टीव्हीवरील सर्वात मोठा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. घरातील सदस्य आपापल्या खेळातून लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वीच शालीनने सलमान खानला अॅटिट्यूड दाखवण्याची चूक केली होती त्यामुळे सलमान खानने शालीन भानोटची चांगलीच शाळा घेतली होती. याआधीही सलमान खानला माज दाखवल्यामुळे अनेक स्पर्धकांना चांगलेच भारी पडले होते.

शालीन भनोट

जेव्हापासून टीव्ही स्टार शालीन भानोट ‘बिग बॉस 16’ चा भाग बनला आहे, तेव्हापासून तो टीना दत्तासोबतच्या जवळीकांमुळे तर कधी त्याच्या खेळांमुळे चर्चेत आला आहे. अलीकडे, वीकेंड का वार दरम्यान, शालीनने सलमान खानच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले होते, त्यानंतर सलमानने त्याची शाळा घेतली होती.

शहनाज गिल

बिग बॉस फेम शहनाज गिल सलमान खानची आवडती आहे. पण  जेव्हा ती बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून होती, तेव्हा एकदा तिने वीकेंड का वार दरम्यान आपल्या मर्यादा ओलांडल्या होत्या. शोमध्‍ये लाडात येऊन ती उगीच जोरजोरात रडायला लागली होती. त्यानंतर सलमान खानने तिला खूप ओरडले होते आणि बाहेर लॉनमध्ये पाठवले.

शमिता शेट्टी

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीने सलमान खानशी असलेल्या जवळीकीचा फायदा घेत माज दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सलमान खानने अभिनेत्रीला तिची जागा दाखवली. सल्लू मियाँने हसून तिची खिल्ली उडवत तिला राणी एलिझाबेथ ही पदवी दिली.

पारस छाबरा

पारस छाबरा ‘बिग बॉस 13’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसला होता. वीकेंड का वार या शोमध्ये सलमान खान आणि पारस छाबरा यांच्यात वाद झाले होते. त्यादरम्यान सलमानला पारसचे वागणे खटकले त्यानंतर त्याने पारस छाबरावर जोरदार टीका केली.

गौहर खान

‘बिग बॉस 7’ ची विजेती गौहर खाननेही सलमान खानला माज दाखवून पश्चाताप पावली.  सलमान खानला माज दाखवल्यामुळे तिची शाळा घेण्यात आली होती. अभिनेत्रीने मी सर्वात गोरी आहे असे म्हटले होते तेव्हा सलमानला तिचे हे विधान आवडले नाही आणि त्याने गौहरला चांगलेच धारेवर घेतले.