रविना टंडनचे नाव तिच्या सख्ख्या भावाशी जोडले गे...

रविना टंडनचे नाव तिच्या सख्ख्या भावाशी जोडले गेले, तेव्हा ती भयंकर दुखावली होती… (When The Name Of Raveena Tanden Was Linked With Her Real Brother : Actress Was Badly Hurt)

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीनाने तिच्या अभिनयाने लाखो-करोडो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रवीनाने ‘पत्थर के फूल’ या चित्रपटापासून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. सलमान खानसोबत आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या रविनाने नंतर अनेक कलाकारांसोबत काम केले, त्यापैकी काही जणांसोबत तिचे नावही जोडले गेले. परंतु एक वेळ अशी आली होती की, तिचे नाव तिच्या सख्ख्या भावाशी जोडले गेले. अलिकडेच रवीना टंडनने तिच्या काही जुन्या आठवणींना उजाळा देत असताना ही गोष्ट सांगितली आहे. यावेळी ती म्हणाली की, एकेकाळी माझे नाव हे एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या टॅब्लॉईडच्या गॉसिप कॉलममध्ये असायचे. एकदा तर त्यात मी माझ्या भावासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले होते.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

नुकतंच रवीनाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने याबाबतचा खुलासा केला आहे. यावेळी रवीना म्हणाली की, “मी माझ्या सहकलाकारांना नेहमीच माझे मित्र मानले आहे. मात्र हे सत्य मासिकांचे संपादक स्विकारु शकले नाही आणि त्यामुळे माझे नाव अनेकांसोबत जोडले जायचे.”

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

पुढे ती म्हणाली, “मला आजही ते दिवस आठवतात, जेव्हा अनेक रात्री मला झोप येत नव्हती. मी नेहमी झोपायला जातेवेळी रडायची. मला दर महिन्याला एक भीती असायची की एखादा पिवळ्या रंगाचा गॉसिप कॉलम माझ्या प्रतिष्ठेला कलंकित करेल. तो मला, माझी विश्वासार्हता, माझी प्रतिष्ठा, माझ्या आईवडिलांना संकटात टाकेल आणि त्यावेळी मला हे सर्व काय आहे हे वाचून आश्चर्य वाटायचे,” असेही रवीना म्हणाली.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

यापुढे रवीनाने सांगितले की, “एकदा माझे नाव माझ्या भावाशीही जोडले गेले होते. अनेक वृत्तपत्रांनी लिहिले होते की, रवीनाला एक सुंदर आणि गोरा मुलगा सोडायला येतो. आम्ही रवीना टंडनचा बॉयफ्रेंड शोधला आहे. आम्ही कलाकार कोणाकोणाला आणि किती लोकांना समजवून सांगणार होतो? त्यावेळी आम्ही एखाद्याला थांबून हॅलो म्हटले तरीही ते चुकीचे असायचे.”

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

रवीनाने १९९१ मध्ये ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर ‘अंदाज़ अपना-अपना’, ‘खिलाड़ियों का खिलाड़ी’, ‘बड़े मियां छोटे मियां’,  शूल आणि अक्स यांसारख्या अनेक दमदार चित्रपटांमध्ये तिने काम केले. ‘दमन’ चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सध्या रवीना ही तिच्या आगामी ‘आरण्यक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.