अनन्या पांडेच्या अभिनयावर खुश होऊन दिग्दर्शकाने...

अनन्या पांडेच्या अभिनयावर खुश होऊन दिग्दर्शकाने दिले होते 500 रुपये बक्षीस (When The Director Was Happy With The Acting Of Ananya Pandey, Gave A Reward Of 500 Rupees)

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी स्टार किड्सच्या यादीत अनन्या पांडेचे नाव समाविष्ट आहे. अनन्या पांडेने अल्पावधीतच लोकांच्या मनात खास स्थान निर्माण केले. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या अनन्याने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम करून इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली.

‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपट केल्यानंतर अनन्याने  ‘पति पत्नी और वो’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटाच्या शूटींगवेळी तिचा अभिनय पाहून चित्रपटाचे दिग्दर्शक मुदस्सर अजीज खूप खूश झाले आणि आनंदात त्यांनी अनन्या पांडेला 500 रुपये बक्षीस म्हणून दिले होते.

याबाबत माहिती देताना अनन्या पांडेने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ती कार्तिक आर्यनसोबत एका सीनसाठी शूटिंग करत होती. त्या सीनमध्ये अनन्याला कोणताही डायलॉग बोलायचा नव्हता. फक्त तिला कार्तिक आर्यनच्या संवादावर प्रतिक्रिया द्यायची होती, जे सहसा खूप कठीण असते.

“शॉट पूर्ण केल्यानंतर मुदस्सर सरांनी सीनचे खूप कौतुक केले. यानंतर ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला 500 रुपयांची नोट देऊन म्हणाले की मला हा शॉट खूप आवडला.”

अनन्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास सर्वात शेवटी ती लायगर या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत काम केले. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. आता लवकरच ती ड्रीम गर्ल 2 मध्ये दिसणार आहे.