निवेदकाच्या तू कोण? या प्रश्नावर रणवीर सिंहने अ...

निवेदकाच्या तू कोण? या प्रश्नावर रणवीर सिंहने अप्रतिम उत्तर देऊन जिंकली चाहत्यांची मनं (When The Commentator Asked Ranveer Singh, Who Are You, The Actor’s Answer Will Win Your Heart)

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र आता त्याच्या चाहत्यांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे. रणवीरने त्याला विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे असे काही उत्तर दिले ज्यामुळे त्याने सर्वांची मने जिंकून घेतली आहेत.

रणवीर अबुधाबीमध्ये फॉर्म्युला 1 रेसमध्ये गेला होता तेव्हा, माजी रेसिंग ड्रायव्हर आणि निवेदक मार्टिन ब्रुन्डल यांनी त्याची मुलाखत घेतली. रणवीर कोण आहे हे त्याला माहीत नव्हते. त्यामुळे त्याने रणवीरला विचारले की, तू कोण आहेस, मी तुला ओळखले नाही.

ब्रुन्डलने रणवीरला विचारले, सध्या तुला कसे वाटते? या प्रश्नाला उत्तर देताना रणवीर म्हणाला की, सध्या मला मी जगाच्या उंच टोकावर असल्यासारखे वाटते. यानंतर ब्रुन्डलने विचारले की,तू कोण आहेस ? मी तुला ओळखले नाही. या प्रश्नाचे उत्तर देताना रणवीर म्हणाला, मी बॉलिवूड अभिनेता आहे. सर, मी भारतातील मुंबईचा आहे. मी एक मनोरंजन करणारा आहे. रणवीरचे हे उत्तर चर्चेचा विषय बनला असून त्याचे चाहते त्याच्यावर खूप खुश झाले आहेत.

इतकेच नाही तर निवेदकाने रणवीर सिंगच्या ऑफ कलर कपड्यांबद्दलही विचारले. रणवीर सिंग आपल्या चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. लोक त्याच्या प्रत्येक स्टाइलकडे आकर्षित होतात.

रणवीर सिंगच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, सध्या तो आपल्या आगामी ‘रॉकी अॅण्ड रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट दिसणार आहे. याशिवाय रणवीरकडे इतरही अनेक प्रोजेक्ट्स आहेत.