नोरा फतेहीला कास्टिंग डायरेक्टरने फोन करुन घरी ...

नोरा फतेहीला कास्टिंग डायरेक्टरने फोन करुन घरी बोलवले त्यानंतर तिच्या मनात आले की, हा देश सोडून जावे (When The Casting Director Called Nora Fatehi Home, The Actress Was Thinking Of Leaving The Country)

मूळची कॅनडाची नागरिक असलेल्या नोरा फतेहीने आपले करीअर घडवण्यासाठी भारताची निवड केली. इथे तिने प्रचंड यशही मिळवले आहे. तिने 2014 मध्ये ‘रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले, परंतु तिला खरी ओळख जेव्हा ती ‘बिग बॉस 9’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली तेव्हा मिळाली.

नोरा जेव्हा कॅनडाहून भारतात आली होती, तेव्हा तिलाही सुरुवातीच्या दिवसात खूप संघर्ष करावा लागला होता. एकदा मुलाखतीदरम्यान, अभिनेत्रीने एका कास्टिंग डायरेक्टरसोबतचा अनुभव  शेअर केला.

मुलाखतीदरम्यान नोरा फतेहीने सांगितले होते की,  एका महिला कास्टिंग डायरेक्टरने मला आपल्या घरी बोलावले होते. तेव्हा मी नुकतीच भारतात आली होती. त्या कास्टिंग डायरेक्टरने मला घरी बोलावले आणि म्हणाली, “तुझ्यासारखे बरेच लोक इथे येतात, तुझ्यासारख्या लोकांमुळे आमची इंडस्ट्री अडचणीत आली आहे. आम्हाला तू इथे नको आहेस.”

या सर्व गोष्टी ती कास्टिंग डायरेक्टर माझ्याशी मोठ्या आवाजात म्हणत होती. एवढेच नाही तर त्या तिने मला टॅलेंटलेस देखील म्हटलं, तिच्या अशा बोलण्याने मला रडू आले असे नोराने मुलाखतीत सांगितले.

नोरा पहिल्यांदा भारतात आली तेव्हा तिला इथली फारशी माहिती नव्हती. मुलाखतीत नोराने त्या कास्टिंग डायरेक्टरचे नाव उघड केले नाही.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम