दिग्दर्शकाने इशा गुप्ताला हासडली शिवी, तिनं केल...

दिग्दर्शकाने इशा गुप्ताला हासडली शिवी, तिनं केली त्याची ऐशीतशी [when the Angry Director Started Abusing Esha Gupta, Know What was Her Reaction]

बॉलिवूडमध्ये सध्या बोल्ड अॅण्ड ब्युटीफूलचा जमाना आहे. त्यामुळे पडद्यावर अभिनय करता आला नाही तरी चालेल पण ती अभिनेत्री बोल्ड दिसायला हवी. अशा अनेक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आहेत. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे इशा गुप्ता (Esha Gupta). इशा तिच्या चित्रपटांमुळे फारशी चमकली नाही पण तिच्या बोल्डनेसमुळे तिने तिचे असंख्य चाहते तयार केले. इशा जितकी बोल्ड अॅण्ड ब्युटीफूल आहे तितकीच ती बिनधास्त आणि बेधडकपण आहे. याचेच उदाहरण म्हणजे इशाला एकदा तिच्या दिग्दर्शकाने रागात शिव्या घातल्या होत्या पण इशाने त्या शांतपणे ऐकून न घेता त्याला त्याच्याच शब्दात सुनावत त्याची बोलती बंद केली होती.    

     तिच्यासोबत घडलेल्या त्या प्रसंगाचा खुलासा स्वत: इशाने एका मुलाखतीत केला होता. इशाने सांगितले, तिला एकदा दिग्दर्शकाने खूप शिव्या घातल्या होत्या ज्यात तिची काहीच चूक नव्हती. खरेतर शुटींगच्या वेळी तिच्या कपड्यांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता जो त्या दिग्दर्शकाला माहीत नव्हता. तो प्रॉब्लेम निस्तरून जेव्हा इशा सेटवर परतली तेव्हा तिला लेट झाल्याचे त्या दिग्दर्शकाने सांगितले. पण इशा बोलली की मी सेटवर सगळ्यांच्या आधी पोहचले आहे. तिचे असे बोलणे ऐकून ती खोटे बोलत आहे असे दिग्दर्शकाला वाटले आणि त्याने इशाला शिव्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर इशासुद्धा शांत बसली नाही. तिनेही त्याला त्याच्याच भाषेत शिव्या देत खडेबोल सुनावत उत्तर दिले. त्यामुळे त्या दिग्दर्शकाची बोलतीच बंद झाली. त्या घटनेनंतर इशा तिचे शूट अर्धवट सोडून निघाली. जोपर्यंत दिग्दर्शक तिची माफी मागत नाही तोपर्यंत ती सेटवर परतणार नव्हती. त्यामुळे त्या दिग्दर्शकाने इशाची माफी मागितली, त्यानंतर इशाने शुटींगला पुन्हा सुरुवात केली.

इशा सध्या तिच्या ‘आश्रम 3’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री इशा गुप्ताने तिच्या अभिनयातील करियरची सुरुवात 2012 मध्ये इमरान हाश्मीसोबत ‘जन्नत 2’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटासाठी तिला फिल्म फेयरचा बेस्ट फीमेल डेब्यू अवॉर्डसुद्धा मिळाला होता. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपटांसोबतच इशा वेबसिरीज आणि म्युझिक व्हिडीओमध्येपण दिसते. सोशल मीडियावरपण ती बरीच अॅक्टीव्ह असते. तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच तिने तिची बेडरुम आणि बाथरूम सेल्फी शेअर केली होती जी काहीच वेळात तुफान व्हायरल झाली.

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)