‘बिग बॉस 15’ ची विजेती तेजस्वी प्रकाशने एक्टिंग...

‘बिग बॉस 15’ ची विजेती तेजस्वी प्रकाशने एक्टिंगसाठी नोकरी सोडली; ऐका तिच्या जीवनातील रोचक गोष्टी (When Tejaswi Prakash Left Her Job For Acting : Know Interesting Facts About Winner Of ‘Big Boss 15’)

‘बिग बॉस 15’ ची विजेती, आणि टी.व्ही. क्षेत्रातील गाजलेली अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आता नागिणीच्या  भूमिकेत प्रेक्षकांची मने रिझवीत आहे. कारण कुंद्रा सोबत रिलेशनशिपमध्ये राहून ती चर्चेत आहे. आज तेजस्विने भरघोस यश मिळवले असले तरी तिला आधी संघर्ष टळला नव्हता. तिच्या जीवनातील काही रोचक गोष्टी पाहूयात.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
टी.व्ही. क्षेत्रातील तेजस्वी प्रकाश ही गुणी अभिनेत्री आहे. पण या क्षेत्रात येण्याआधी ती इंजिनियर होती. मॉडेलिंग आणि एक्टिंग क्षेत्रात येण्याआधी तिने इंजिनियर म्हणून नोकरी केलेली आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
खरं तर तेजस्वीला बालपणापासूनच अभिनय क्षेत्राची आवड होती. त्यामुळे तिनं ही इंजिनियर म्हणून स्वीकारलेली नोकरी सोडून दिली.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
तेजस्वीने आपली अभिनय कारकीर्द 2011साली आलेल्या ’26-12’ या मालिकेने सुरू केली. त्यानंतर तिने ‘संस्कार- धरोहर अपनों की’ वगैरे मालिकेतून आणि ‘बिग बॉस’ तसेच ‘खतरों के खिलाडी 10’ या रिऍलिटी शो मधून ती चमकली. आता एकता कपूरच्या ‘नागिन 6’ या कार्यक्रमात प्रमुख भूमिकेत आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
तिच्या खासगी जीवना बाबत सांगायचं तर ती करण कुंद्रा सोबत रिलेशनशिप मध्ये आहे. चाहते आता या दोघांच्या लग्नाची प्रतीक्षा करत आहेत.