‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक...

‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी, ‘मला कपडे काढून नाचायला सांगितलं होतं…’ तनुश्री दत्ताने केला होता आरोप (When Tanushree Dutta Accused ‘The Kashmir Files’ Director Vivek Agnihotri of Harassment, Claimed That Vivek Had Told Her ‘Kapde Utaar Ke Nacho’)

आज सगळीकडे द कश्मीर फाइल्स चित्रपटाचे कर्ताकरविता विवेक अग्निहोत्रीच्या नावाचा गाजावाजा होत आहे. सेलिब्रिटींपासून, राजकारणी ते सामान्य जनतेपर्यंत सर्वच त्यांची भरभरून प्रशंसा करत आहेत. परंतु काही वर्षांपूर्वी याच विवेक अग्निहोत्रीवर #MeTooच्या मोहिमेअंतर्गत काही आरोप करण्यात आले होते. विवेक अग्निहोत्रीने, मला कपडे काढून नाचण्यास सांगितले असल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने त्याच्यावर केला होता. त्यावर मोठा वादंग उठला होता. जाणून घेऊया नेमके काय घडले होते…   

सदर प्रकरण २०१८ साली घडले, ज्यावेळेस मीटूची मोहीम जोरात सुरू होती. याच दरम्यान तनुश्री दत्ताने विवेक अग्निहोत्रीवर गंभीर आरोप केला होता. तनुश्रीने विवेक अग्निहोत्री याच्या २००५ झाली प्रदर्शित झालेल्या ‘चॉकलेट: डीप डार्क सीक्रेट’ या चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तनुश्रीने विवेकवर आरोप लावताना म्हटले की, “सेटवर चित्रपटाच्या एका सीनमध्ये चित्रपटातील नायक इरफान खानला तिच्याकडे पाहून चेहऱ्यावर एक्सप्रेशन्स द्यायचे होते. त्यावेळेस विवेक अग्निहोत्रीने तिला ‘कपडे काढून नाच’ असे सांगितले. परंतु प्रत्यक्ष त्यांच्या सीनमध्ये असे काही म्हटलेले नव्हते. मात्र विवेकची इच्छा होती की, मी कपडे काढून नाचावे आणि इरफानने माझ्याकडे पाहून चेहऱ्यावर एक्सप्रेशन द्यावे.”

तनुश्रीने सांगितले होते की, त्यावेळेस दिग्दर्शकाचे ते बोलणे ऐकून ती वैतागली होती. इरफान खानला देखील विवेकचे वागणे पटले नाही. त्याने, ‘ हे तुम्ही काय करताहात, तिला असं काही करण्याची गरज नाही आहे, मला अभिनय करता येतो.’ अशा शब्दात विवेकला सुनावले होते. सुनील शेट्टीने देखील तेव्हा विवेकला टोकले होते.

एवढं सगळं झाल्यानंतर काय झालं तर, विवेक अग्निहोत्रीने तनुश्रीने त्याच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आणि तनुश्रीने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हे आरोप केले असे म्हटले.

द कश्मीर फाइल्सचे यश आणि विवेक अग्निहोत्रीला त्यामुळे मिळत असलेली लोकप्रियता या दरम्यान पुन्हा एकदा त्याच्यावरील आरोपांची चर्चा समोर आली आहे. परंतु या चर्चेचा त्याच्या चित्रपटाच्या यशावर काहीही परिणाम झालेला दिसत नाहीये. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आठवड्याभरात चित्रपटाने १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश मिळवत १२०.३५ कोटींची कमाई केली आहे.