कामाच्या मोबदल्यात या अभिनेत्यांकडे केली गेली व...

कामाच्या मोबदल्यात या अभिनेत्यांकडे केली गेली विचित्र मागणी (When Strange Demands Made from These TV Actors in Exchange of Work, Mind Will be Baffled by Hearing)

मोठा पडदा असो किंवा छोट्या पडदा इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांना कधी ना कधी कास्टिंग काउचसारख्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे. कास्टिंग काउचबद्दल बोलायचे तर ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये ही काही मोठी गोष्ट नाही. या मुद्द्यावर अनेक वादविवादही झाले आहेत. कास्टिंग काउचसारख्या समस्येला फक्त अभिनेत्रींनाच सामोरे जावे लागते असे जर तुम्हाला वाटत असेल तर तसे अजिबात नाही, कारण इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्यांनाही अशा परिस्थितीतून जावे लागले आहे. कास्टिंग काउचविरोधात अनेकांनी आवाजही उठवला आहे.

मोहित मलिक

 टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता मोहित मलिकने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला सु्द्धा कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, एकदा त्याला पात्राबद्दल चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले होते. जेव्हा तो निर्मात्याशी रूममध्ये बोलत होता, तेव्हा तो निर्माता त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करू लागला, त्यानंतर मोहित मलिकने तिथून निघून जाणे पसंत केले.

राजीव खंडेलवाल

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता राजीव खंडेलवालही कास्टिंग काउचच्या समस्येची शिकार झाला होता. भूमिकेच्या बदल्यात एका दिग्दर्शकाने त्याच्याकडे सेक्सची मागणी केली होती, परंतु अभिनेत्याने त्यासाठी स्पष्टपणे नकार दिला. दिग्दर्शकाची ही मागणी पूर्ण न केल्यामुळे त्याला ती भूमिका मिळाली नाही.

रित्विक धनजानी

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता ऋत्विक धनजानीसोबत देखील कास्टिंग काउचचा प्रकार झाला होता. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, एक एजंट त्याला एका व्यक्तिरेखेबद्दल बोलण्यासाठी एका खोलीत घेऊन गेला, त्या खोलीत प्रेम, पार्टी आणि सेक्स… असे लिहिले होते. त्या खोलीत नेल्यानंतर एजंटने त्याच्या मांडीला हात लावायला सुरुवात केली, परंतु त्यावेळी अभिनेत्याला काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले त्यामुळे तो तिथून कसा तरी बाहेर पडला.

करण टॅकर

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता करण टॅकरनेसुद्धा कास्टिंग काउचचा सामना केला आहे. करणने एका मुलाखतीत सांगितले होते की, एका कास्टिंग डायरेक्टरने त्याला स्पष्टपणे विचारलेले की तुला कठोर परिश्रम करायला आवडेल की हुशारीने काम करायला आवडेल.

अंकित सिवाच

अभिनेता अंकित सिवाचलाही आपल्या स्ट्रगलच्या दिवसांमध्ये अशा प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, स्ट्रगलच्या दिवसांत एका एजन्सीने कामाच्या बदल्यात त्याचे न्यूड फोटो मागितले होते, परंतु अभिनेत्याने त्यांची मागणी धुडकावून लावत न्यूड फोटो देण्यास नकार दिला.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम