श्वेता तिवारीने नॅशनल टेलिव्हिजनवर असे काही रंग...

श्वेता तिवारीने नॅशनल टेलिव्हिजनवर असे काही रंग दाखवले की, चाहत्यांनी रागाने तिच्यावर तोंडसुख घेतले (When Shweta Tiwari Did This Thing on National TV, Actress Got Trolled by Angry Fans)

सौंदर्य आणि फिटनेसबाबत आपल्यापेक्षा तरुण असलेल्या अभिनेत्रींना बरोबरीची टक्कर देणारी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अभिनेत्री श्वेता तिवारी ही घरोघरी प्रेरणा या नावाने ओळखली जाते. ‘कसौटी ज़िंदगी की’ या मालिकेतील प्रेरणाच्या भूमिकेमुळे दर्शक तिच्याकडे अजूनही एक आदर्श सून म्हणूनच पाहतात. एरव्ही श्वेता बरेचदा वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसते आणि ग्लॅमरस लूकमध्येही ती तितकीच सुंदर दिसते. परंतु श्वेताला बिकिनी लूकमध्ये फारच थोड्यांनी अथवा कोणी पाहिलेही नसेल. तरीही एकदा श्वेता तिवारीने नॅशनल टेलिव्हिजनवर बोल्डनेसच्या सर्व मर्यादा मोडीत काढणारी हरकत केली होती, ज्यामुळे चाहते नाराज झाले होते. रागाच्या भरात चाहत्यांनी श्वेताला बरेच खडे बोल सुनावले होते. जाणून घेऊया नेमके काय झाले होते?

तसे पाहिले तर दर्शकांना आदर्श सून वाटणारी श्वेता तिवारी नेहमी डिसेंट लूकमध्ये राहणेच पसंत करते. परंतु २००९ साली याच श्वेताने आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजाने सगळ्यांनाच हैराण करून सोडले होते. ‘इस जंगल से मुझे बचाओ’ नावाच्या एका रिॲलिटी शोमध्ये ती बिकिनी घालून आंघोळ करताना दिसली होती. नॅशनल टिव्हीवरील कार्यक्रमातील श्वेताचा हा अवतार पाहिल्यानंतर चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला होता. त्यानंतर अनेकांनी अशी भूमिका केल्याबद्दल तिला ट्रोल करत चांगलेच तोंडसुख घेतले होते.

२००९ मध्ये सोनी टीव्हीवर ‘इस जंगल से मुझे बचाओ’ नावाचा रिॲलिटी शो प्रसारित केला जात होता, ज्यात स्पर्धक म्हणून श्वेता तिवारीने भाग घेतला होता. या शोमधून श्वेताचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात एका झऱ्याखाली ती बिकिनी घालून न्हाताना दिसत होती. हे पाहून चाहते चिडले आणि त्यांनी तिची वाईट शब्दात नालस्ती केली.

नेहमी साडीमध्ये दिसणाऱ्या एका आदर्श सूनेला मिनी स्कर्ट आणि ब्ल्यू बिकिनीमध्ये पाहणे साहजिकच तिच्या दर्शकांना अजिबात आवडलं नाही. तर दुसरीकडे श्वेताच्या या लूकने शोचा टीआरपी मात्र जबरदस्त वाढवला होता. तरीही चाहत्यांच्या नाराजीमुळे श्वेताने या शोमधून बाहेर पडणे पसंत केले होते.