प्रेमभंगाचे दुःख सहन न झाल्याने श्रुती हासनने ...

प्रेमभंगाचे दुःख सहन न झाल्याने श्रुती हासनने स्वतःला दारूत बुडविले (When Shruti Haasan Became A Victim Of Depression And Addicted To Alcohol : Reason Is Very Surprising)

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रुती हासन आता ‘बेस्ट सेलर ‘ या मालिकेत काम करते आहे यामध्ये तिच्यासोबत मिथुन चक्रवर्ती दिसणार आहे. एक वेळ अशी आली होती की, ही श्रुती नैराश्यग्रस्त झाली. अन दारूच्या आहारी गेली होती. याचं कारण श्रुतीने एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
श्रुती ही कमल हासन व सारिका यांची मुलगी आहे. तिच्या जन्मानंतर २ वर्षांनी तिच्या या आई-बाबानी लग्न केलं होतं. त्यामुळे श्रुती तिच्या खासगी जीवनाबाबत कायम चर्चेत राहिली. श्रुतीने एका मुलाखतीत सांगितलं की, प्रेमभंग झाल्याने ती इतकी निराश झाली होती की, तिला दारूचे व्यसन लागले. त्याचा परिणाम करिअर वर होऊ लागला.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
मायकेल कोर्सल या विदेशी मित्रासोबत श्रुतीचे नाव जोडले गेले होते. २०१६ साली हे दोघे रिलेशनशिपमध्ये आले. अन २०१९ मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. या कारणाने ती पूर्णतः कोलमडून गेली. कमालीची निराश झाली. अन तिला दारूचे व्यसन लागले. त्याचा परिणाम झालेला दिसताच पुढे तिने स्वतःला सावरले.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
या मायकेलशी श्रुती वेगळी झाली, त्यामुळे तिला प्रेमसंबंधात बरंच काही शिकायला मिळालं. तसं तिनंच कबूल केलं. मात्र तिचं नाव रणबीर कपूर आणि सामंथा रूथ प्रभूचा आधीचा नवरा नागा चैतन्य यांच्याशी देखील जोडलं गेलं होत.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
दक्षिणेकडील चित्रपटात यशस्वी नायिका म्हणून श्रुतीने नाव कमावलं आहे. तिनं बॉलिवूडमध्ये शिरकाव करून पहिला. अक्षय कुमार सोबत ‘गब्बर इज बँक’ तर जॉन अब्राहम सोबत ‘वेलकम बँक’ हे हिंदी चित्रपट तिनं केले.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम