काजोलच्या वाढदिवसानिमित्त अजय देवगणने शेअर केला...

काजोलच्या वाढदिवसानिमित्त अजय देवगणने शेअर केला मजेशीर व्हिडिओ (‘When She Calls, I Never Fail To Pick Up…’ Ajay Devgn’s Special Birthday Wish For Wife Kajol)

बॉलिवूड अभिनेत्री काजोल आज तिचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या सोशल मीडियावर काजोलचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. पण या सर्वात काजोलच्या पतीदेवांनी म्हणजेच अभिनेता अजय देवगणने आपल्या पत्नीला थोडे हटके विश केले आहे. अजयने काजोलच्या वाढदिवसानिमित्त एक खास व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या व्हिडिओत अजयच्या फोनवर काजोलचा फोन येताना दिसतो. त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता अजय तो फोन उचलतो. फोन उचलल्यावर व्हिडिओत काजोलचे वेगवेगळ्या पोजमधले काही ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात. फोटोत काजोलने लाल रंगाचा थाय हाय स्लिट ड्रेस घातल्याचे पाहायला मिळते.

अजयने या व्हिडिओला, जेव्हा ती फोन करते , तेव्हा मी तो उचलायला विसरत नाही, अशी कमेंट केली आहे. चाहत्यांना अजयचे कॅप्शन खूप आवडले आहे. अनेकांनी या व्हिडिओला मजेशीर कमेंट केल्या आहेत.

एका यूजरने कमेंटमध्ये दहशतीचे दुसरे नाव काजोल देवी असे म्हटले आहे. तर दुसऱ्याने पत्नीची दहशत आहे असे म्हटले आहे. अनेकजण कमेंटमध्ये काजोलला शुभेच्छा देत आहेत. तर काहीजण अजयला आदर्श पती म्हणत आहेत.

काही दिवसांपूर्वीच काजोलने तिच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीची ३० वर्षे पूर्ण केली. तेव्हाही अजयने तिचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या.