क्रिश बनण्याच्या नादात हवेत लटकत राहिला शाहरुख ...

क्रिश बनण्याच्या नादात हवेत लटकत राहिला शाहरुख खान, व्हिडिओ होत आहे व्हायरल (When Shahrukh Khan Was Left Hanging In The Air To Become Krish, You Will Laugh Watching The Video)

बॉलिवूडमध्ये किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान आपल्या रोमॅण्टिक स्टाईलसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. रोमान्सने भरलेला त्याचा प्रत्येक चित्रपट लोकांना आवडतो. याच वैशिष्ट्यामुळे तो चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. पण रोमॅण्टिक चित्रपटाचा बादशहा असणाऱ्या शाहरुख खानला एकदा हृतिक रोशनसारखे क्रिश बनण्याची इच्छा झाली होती. त्यासाठी त्याने क्रिशप्रमाणे हवेत उडण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो प्रयत्न असफल ठरला. त्यामुळे शाहरुख खूप अस्वस्थ झाला होता.

बॉलिवूडमध्ये शाहरुख खानला जसे किंग खान म्हणून ओळखले जाते, त्याचप्रमाणे हृतिक रोशनला सुपरहिरो म्हणून ओळखले जाते. हृतिक रोशनचे ‘क्रिश’ आणि ‘क्रिश 2’ हे चित्रपट खूप हिट ठरले होते. क्रिशच्या भूमिकेत प्रेक्षकांना हृतिक खूप आवडला होता. त्यामुळे हृतिकवर प्रेम करणारी मुलंही क्रिशसारखी त्याची नक्कल करतात. एकदा शाहरुख खानला सुद्धा क्रिश बनण्याचा मोह आवरला नाही. पण नंतर त्याला या गोष्टीचा खूप पश्चाताप करावा लागला.

फिल्मफेअरने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख खान क्रिश बनल्याचे तुम्ही पाहू शकता. पण क्रिशची नक्कल करण्याच्या नादात तो हवेत लटकत राहिला आणि नंतर त्याने हृतिकला मदतीसाठी फोन केल्याचे पाहायला मिळते.

व्हिडिओमध्ये शाहरुख खान हृतिक रोशनला म्हणतो, “हे खूपच अवघड आहे हृतिक. मी इथे अडकलो आहे. यावर हृतिक शाहरुखकडे त्याचे डॉन चित्रपटातील जॅकेट मागतो. त्यावर किंग खान म्हणतो, “यार, तू माझे सर्व कपडे घे. पण हा विनोद नाही. यानंतर शाहरुख खान हृतिकला म्हणतो की,

“क्रिशच्या शूटिंगदरम्यान तुझ्यासोबत खूप वाईट अपघात झाला. तुझ्यासाठी शूट करणे किती कठीण होते ते आमच्या दर्शकांना सांग. यावर हृतिकने हा चित्रपट कसा शूट केला ते सांगितले. यानंतर शाहरुख म्हणाला, “मी हृतिक रोशनला मला खाली उतरव असे सांगू इच्छितो.” शाहरुख खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोकांना तो खूप आवडला आहे.