‘मी दिल्लीवाला आहे, मुंबईतल्या लोकांना खिशात घे...

‘मी दिल्लीवाला आहे, मुंबईतल्या लोकांना खिशात घेऊन फिरतो’, शाहरुखचा व्हिडिओ होतोय व्हायरल (When Shahrukh Khan Said – “I Am A Delhi Wala, I Walk Around With The People Of Mumbai In My Pocket”, Vodeo Going Viral)

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने आपल्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत खास स्थान निर्माण केले आहे. यासाठी कठोर परिश्रम, कौशल्य आणि नशीब या गोष्टी आवश्यक असतात आणि शाहरुख खानकडे त्या होत्या. शाहरुखने अनेकदा मुलाखतींमध्ये आपण केलेल्या संघर्षाचा उल्लेख केला आहे. शाहरुख खान हा मुळचा दिल्लीचा. तिथे घालवलेले क्षण तो अजूनही विसरलेला नाही. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा तो ते क्षण आठवून त्या दिवसांत रमून जातो.

सध्या शाहरुख खानचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो पहिल्यांदा जेव्हा मुंबईत आता होता तेव्हा मुंबईतील लोकांप्रती त्याचा दृष्टिकोन कसा होता हे सांगत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये शाहरुख खान शोचे सूत्रसंचालन करत असलेल्या प्रिती झिंटाशी बोलत आहे. तो म्हणतो, “मी खूप भांडायचो. मी दिल्लीचा आहे. मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा इथली गुंडगिरी पाहिली आणि मला हसायला आले.

शाहरुखच्या या गोष्टीवर प्रिती झिंटाने त्याच्या म्हणण्याचा अर्थ विचारला, तेव्हा शाहरुखने तिला सांगितले, “तिथे लोक भांडताना जराही विचार करत नाही. सरळ समोरच्या व्यक्तीच्या नाकी नऊ आणतात. पण इथे तसं नाही. इथल्या लोकांना मी तिथे दिल्लीत खिशात घेऊन फिरेन. शाहरुख पुढे म्हणतो की, इथल्या लोकांना कसे लढायचे हे देखील माहित नाही. इथले लोक शिव्यापण खूप नम्रपणे देतात. शाहरुखच्या या व्हिडिओला खूप जण लाइक्स करत आहेत.

शाहरुख नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रणबीर आणि आलियाच्या ब्रह्मास्त्र चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता. या चित्रपटात त्याने वैज्ञानिक मोहन भार्गव हे पात्र साकारले आहे.

शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास गेल्या 4 वर्षात त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. पण येत्या काळात तो पठाण, डंकी, लायन आणि ऑपरेशन खुखरी यांसारख्या चित्रपटात दिसणार आहे.