शहनाज गिलने इंग्रजीत लिहिले होते प्रेमपत्र (Whe...

शहनाज गिलने इंग्रजीत लिहिले होते प्रेमपत्र (When Shahnaz Gill Wrote Love Latter In English, You Will Laugh Knowing)

पंजाबची कतरीना कैफ या नावाने प्रसिद्ध असलेल्या शहनाज गिलने संपूर्ण देशातील लोकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांची संख्या वाढत आहे. पंजाबमधील शीख जाट कुटुंबातील शहनाज गिलचा जन्म 27 जानेवारी 1993 मध्ये चांजीगढ येथे झाला. फार कमी वेळात शहनाजने आपली खास ओळख निर्माण केली. मॉडेलिंगपासून करीअरची सुरुवात करून तिने अभिनय आणि गायनातही प्रभुत्व मिळवले. पण शहनाजचं इंग्रजी जरा कमजोर आहे. याचा खुलासा खुद्द शहनाजनेही अनेकदा केला आहे. एकदा शाळेच्या दिवसांत शहनाजने इंग्रजीत प्रेमपत्र लिहिलं होतं.

शहनाज गिलने ‘बिग बॉस 13’ पासून अनेकदा सांगितले आहे की तिचे इंग्रजी चांगले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने इंग्रजी गाणे गाऊन सर्वांना चकित केले होते. शहनाजचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळे आता तिचे इंग्रजी सुधारले आहे असे म्हणता येईल.

शहनाजला प्रेमपत्र लिहिताना तिच्या शिक्षिकेने तिला पकडले. वरुण शर्माच्य ‘बिंगो कॉमेडी अड्डा सीझन 2 या शोमध्ये शहनाजने तिच्या शाळेतील हा मजेदार किस्सा सांगितला. तिने सांगितले होते की, “मला इंग्रजी येत नसल्याने मी लिहिलेले – तू माझा पहिला आणि शेवटचा नवरा आहेस.”

शहनाज म्हणाली की, लहानपणी तिने अशा अनेक चुका केल्या होत्या. पण ते दिवस खूप चांगले होते. बिग बॉस 13 मध्ये सहभागी झाल्यापासून तिने चाहत्यांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे.

बिग बॉस सीझन 13 मध्ये, शहनाजसोबत सिद्धार्थ शुक्लाची जोडी लोकांना खूप आवडली होती. सिद्धार्थआता या जगात नसला तरी आजही त्यांची जोडी सोशल मीडियावर चर्चेत आहे. आता लवकरच शहनाज गिल सलमान खानच्या ‘किसी की भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.