करीनामुळे शाहिद कपूर आणि फरदीन खानमध्ये झाले हो...

करीनामुळे शाहिद कपूर आणि फरदीन खानमध्ये झाले होते कडाक्याचे भांडण (When Shahid Kapoor and Fardeen Khan Fought Each Other Due to Kareena, You Will Be stunned to Know the Reason)

आज जरी शाहिद कपूर आणि करीना कपूर आपापल्या आयुष्यात पुढे गेले असले तरी एक काळ असा होता जेव्हा शाहिद-करीनाच्या प्रेमाचे किस्से सर्वत्र चर्चेत असायचे. शाहिद आणि करीना कपूर एकमेकांवर मनापासून प्रेम करत होते, त्या दोघांनी उघडपणे आपले प्रेम व्यक्त केलेले. अनेक प्रसंगी हे लव्हबर्ड एकत्र दिसायचे. मात्र एकेकाळी करीनामुळे शाहिद कपूर आणि फरदीन खान यांच्यात भांडण झाले होते.

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांचे एकमेकांशी असलेले वैर सर्वश्रुत आहे. सेलिब्रिटींनी आपलं भांडण लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यांची भांडणं जगासमोर येतात. शाहरुख-सलमानच्या भांडणाबद्दल जगाला माहिती होते. आता दोघांमध्ये मैत्री झाल्याचेही लोकांना माहीत आहे, पण शाहिद आणि फरदीनच्या भांडणाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

शाहिद कपूर आणि फरदीन खान ‘फिदा’ चित्रपटात एकत्र दिसले होते. याच चित्रपटापासून दोघांमधील वैर सुरू झाले होते. या चित्रपटात मुख्य भूमिका करीना कपूरने केली होती. हा पहिला चित्रपट होता ज्यात शाहिद आणि करीना एकत्र स्क्रिन शेअर करणार होते, पण चित्रपटात फरदीन खान आणि करीना यांच्यात एक हॉट इंटीमेट सीन शूट केला जाणार होता.

करीना कपूर आणि फरदीन खान यांच्यातील हॉट किसिंग सीनचे शूटिंग सुरू असताना शाहीद कपूरही सेटवर उपस्थित होता. शूटिंगदरम्यान फरदीन आणि करीनाचा हॉट सीन पाहून शाहिद कपूर भडकला. त्याला आपला राग आवरता आला नाही त्यामुळे त्याचे फरदीनशी भांडण झाले. दोघांमध्ये बाचाबाचीही झाली, त्यामुळे दोघांना शांत करण्यासाठी क्रू मेंबर्सना मध्यस्थी करावी लागली होती.

या घटनेनंतर फरदीन खानने एका मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही चांगले मित्र नाही, पण ही फार मोठी भांडणे नव्हती. शाहिदवर टीका करताना तो म्हणाला होता- मी ऐकले आहे की तो माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलत आहे, जे पूर्णपणे बालिश आहे. दुसरीकडे, करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये शाहिद कपूर म्हणाला होता की, माझे त्याच्याशी कोणतेही वैयक्तिक भांडण नाही, पण जर त्याला माझ्यासोबत काही अडचण असेल तर त्याने ते मला फोन करून मिटवू शकला असता, पण तसे केले नाही.