मला माझे यश सांभाळता आले नाही, सारा खानने व्यक्...

मला माझे यश सांभाळता आले नाही, सारा खानने व्यक्त केली खंत (When Sara Khan Could Not Handle Her Success, ‘Bidaai’ Actress did Such a Thing After Falling into Bad Company)

छोट्या पडद्यावर अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या पहिल्याच मालिकेत भरघोस यश मिळवले. काहींना ते यश नीट सांभाळता आले पण काहींनी ते यश अगदीच डोक्यावर घेतले. या अभिनेत्रींच्या यादीत सारा खानचे नाव सर्वात आधी येते. साराने वयाच्या १८ व्या वर्षी बिदाई या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. पहिल्याच मालिकेत तिने प्रेक्षकांच्या मनात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. त्यानंतर तिला मागे वळून पाहण्याची वेळच आली नाही. पण नंतर तिच्या आयुष्यात असे काही घडले की तिला आपले यश सांभाळताच आले नाही. चुकीची संगत पकडून ती आपल्या आई वडीलांपासून वेगळी झाली.

सुंदर आणि हुशार अभिनेत्री सारा खानने ‘बिदाई’ नंतर ‘प्रीत से बंदी ये दोरी राम मिलाई जोडी’, ‘जुनून’ आणि ‘ससुराल सिमर का’ सारख्या मालिकांमध्ये काम केले. व्यावसायिक आयुष्य सुरळीत असूनही तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ उतार आले. साराने स्वत: एका मुलाखतीत कबूल केले होते की, मला माझे यश सांभाळता आले नाही. चुकीच्या संगतीत राहून मी माझ्या आयुष्याचा खेळखंडोबा केला. 

सारा सध्या ‘जासूस बहू’मध्ये दिसत आहे. साराने सांगितले की, जेव्हा मला पहिल्या मालिकेतून यश मिळाले तेव्हा मला यापेक्षाही चांगले काही असते ते माहित नव्हते. तेव्हा मी यशस्वी झाले की नाही, मी लोकप्रिय झाले की नाही याबद्दल मला काहीच माहित नव्हते. त्यावेळी मी खूप लहान होतो. मी वयाच्या १८ व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली.

साराने पुढे सांगितले की, जेव्हा तुम्हाला संघर्ष न करता तुमच्या पहिल्या मालिकेतून यश आणि प्रसिद्धी मिळते तेव्हा त्या यशाची किंमत आपल्याला नसते. ती किंमत समजायला आयुष्यात अनेक वेगवेगळी वळणे आली पण मला ते समजायला खूप वेळ लागला.

सारा जेव्हा मुंबईत आली तेव्हा ती तिच्या कुटुंबापासून खूप दूर होती. अशातच तिला तिच्या पहिल्याच मालिकेतून यश मिळाल्याने ती चूकीच्या संगतीत पडली आणि आई वडीलांपासून पूर्णच वेगळी झाली. साराने खंत व्यक्त करत म्हटले की, मी माझ्या कुटुंबापासून दूर होते, ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. हे मला उशिरा कळले.

त्याचवेळी आई-वडिलांचा आशीर्वाद किती महत्त्वाचा असतो ते मला कळले. जेव्हा तुम्ही तरुण वयात यश मिळवता तेव्हा अनेक लोक तुमच्यावर चुकीच्या संगतीत पडण्याचा प्रभाव पाडतात. अशी माणसे तुमचा जिवलग मित्र म्हणून तुमच्या अवतीभवती असतात. जेव्हा तुम्ही त्यांचा पूर्णपणे प्रभावाखाली येता तेव्हा तुम्ही स्वतःला उद्ध्वस्त करायला सुरुवात करता.