करिश्माच्या कानाखाली मार, असे तिच्या सासूबाईला ...

करिश्माच्या कानाखाली मार, असे तिच्या सासूबाईला कोणी बरं सांगितलं होतं? कारण काय होतं? (When Sanjay Told His Mother To Slap Karishma, You Will Be Stunned To Know The Reason)

90 च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत करिश्मा कपूरचा समावेश झाला होता. करिश्माने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. त्यावेळी करिश्मा इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक मानली जायची. तिने स्वबळावर चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला होता. आपल्या चित्रपट कारकिर्दीत, अभिनेत्रीने एकापेक्षा एक अशा दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले. तिच्या प्रोफेशनल लाइफपासून ते पर्सनल लाईफपर्यंत ती खूप चर्चेत राहिली. 2003 मध्ये करिश्माने दिल्लीतील बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले. मात्र, त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. करिश्माने संजयवर अनेक आरोप केले, त्यापैकी एक म्हणजे एकदा संजयने आपल्या आईला करिश्माला कानाखाली मारण्यास सांगितले होते.

90 च्या दशकात करिश्माची चित्रपटांमध्ये अशी जादू असायची की एका वर्षात तिचे 10-10 चित्रपट प्रदर्शित होत असत. पण वैयक्तिक आयुष्यात तिला खूप त्रास सहन करावा लागला. एकेकाळी करिश्मा अभिषेक बच्चनसोबत लग्न करणार होती. दोघांचा साखरपुडाही झालेला, पण काही कारणास्तव त्यांचे नाते तुटले.

अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करिश्माने संजय कपूरसोबत लग्न केले. त्यांचे लग्न खूप चर्चेत होते. पण लग्नाच्या काही वर्षानंतर 2014 मध्ये त्यांचे नाते तुटले. करिश्माने संजयवर घरगुती हिंसाचार, मारहाण असे अनेक गंभीर आरोप केले होते.

करिश्मा कपूरने तिच्या तक्रारीत म्हटले होते की, जेव्हा ती गरोदर होती तेव्हा तिचे वजन वाढले होते. प्रेग्नेंसीनंतर कपडे तिला शोभत नव्हते. त्यामुळे संजय तिच्यासोबत गैरवर्तवणूक करायचा.

इतकंच नाही तर करिश्माने असा दावाही केला होता की, एकदा एक ड्रेस तिला फिट बसत नव्हता तेव्हा संजयने आपल्या आईला करिश्माला मारायला सांगितलं होतं. करिश्माने सांगितले की, “संजयने केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी माझ्याशी लग्न केले होते. पण त्याने आयुष्यात असे काही केले नाही की त्याला मीडिया कव्हरेज मिळेल. अशा स्थितीत ट्रॉफी वाइफप्रमाणे तो माझी जगाला ओळख करून देत असे.’’