ऐश्वर्या रायच्या निळ्या डोळ्यांवर फिदा झाले संज...
ऐश्वर्या रायच्या निळ्या डोळ्यांवर फिदा झाले संजय लीला भन्साळी : तिला सांगून मोकळे सुद्धा झाले ते… (When Sanjay Leela Bhansali Fell In Love With Aishwarya Rai’s Blue Eyes, He Said This To Actress)

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचे सर्वच चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाला तर फिल्मफेअरची 17 नामांकने मिळाली होती. या चित्रपटाशी संबंधित हा किस्सा आहे. ऐश्वर्या रायच्या (Aishwarya Rai) निळ्या डोळ्यांवर भन्साळी फिदा झाले होते. आणि ही गोष्ट तिला सांगून मोकळे सुद्धा झाले होते ते…

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटाचा खास खेळ आयोजित करण्यात आला होता. ज्याला संजय लीला भन्साळी हजर राहिले होते. चित्रपटाची समाप्ती झाल्यावर लॉबीमध्ये भन्साळींना एक देखणी मुलगी भेटली. तिने ओळख करून दिली, ‘हाय, मी ऐश्वर्या राय…’ यावर भन्साळींनी तिच्याशी हात मिळवला. पण त्यांची नजर ऐश्वर्याच्या डोळ्यांवर खेळली…

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
ऐश्वर्याचे सुंदर निळे डोळे पाहताच भन्साळी यांचीच हम दिल दे चुके सनम अशी अवस्था झाली. याच सिनेमासाठी ते रूपसुंदर नायिकेच्या शोधात होते. अन ऐश्वर्याला पाहताच त्यांना नंदिनी गवसली… त्यांनी ऐश्वर्यास आपल्या चित्रपटाची नायिका बनविले.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
ऐश्वर्याने तेव्हा मिस वर्ल्ड हा खिताब जिंकला होता. अन त्याच्या कोषात वावरणारी ऐश्वर्या नंदिनीच्या भूमिकेस न्याय देऊ शकेल की नाही, याबाबत निर्माते साशंक होते. पण भन्साळींना विश्वास वाटत होता, जो तिने सार्थ करून दाखवला…. तिचे रूप आणि उत्तम अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम