संजय दत्तला सलग दोन दिवस लागली होती झोप, अभिनेत...

संजय दत्तला सलग दोन दिवस लागली होती झोप, अभिनेत्याची हालत पाहून नोकराची हालत झाली होती खराब (When Sanjay Dutt Slept for Continious two day, Seeing Actor’s Condition Servant got scared)

  बॉलिवूडचा मुन्ना भाई म्हणजेच संजय दत्त आपल्या वैयक्तिक आयुष्यात एकेकाळी  ड्रग्सच्या आहारी गेला होता हे बहुतेक सगळ्यांना माहीत आहे. याशिवाय अनेक गंभीर प्रकरणांमुळे तो तुरुंगातही गेला आहे. संजू बाबाने आपल्या आयुष्याशी निगडित अनेक किस्से स्वतः चाहत्यांना सांगितले आहेत. या दरम्यान, त्याच्या आयुष्याशी संबंधित आणखी एक रंजक किस्सा सध्या खूप चर्चेत आहे. एकदा संजू बाबा सलग दोन दिवस झोपला होता. त्याची तेव्हाची हालत पाहून त्याच्या घरातील नोकराचे धाबे दणाणले होते.

असे म्हटले जाते की, एकदा संजय दत्तने ड्रग्जचे अतिरिक्त सेवन केले होते. त्यामुळे तो सलग दोन दिवस झोपला होता. दोन दिवसांनी जेव्हा तो उठला आणि त्याने आपल्या नोकराकडून खायला मागितले तेव्हा त्याला पाहताच त्या नोकराची अवस्था बिकट झाली होती. संजय दत्तचा तो अवतार पाहून तो ढसाढसा रडू लागला.

शालेय जीवनापासूनच संजय दत्तला अंमली पदार्थांचे व्यसन होते. कॉलेजमध्ये आल्यावर त्याने ड्रग्ज घेण्यास सुरुवात केली. नशा आणि ड्रग्जच्या व्यसनाने आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे क्षण संजू बाबाने उद्ध्वस्त केले. या सवयीबद्दल बोलताना स्वतः संजय दत्त म्हणाला होता की, एकेकाळी मी खूप नशा करायचो. एके दिवशी मी ओव्हरडोस घेतल्यानंतर माझ्या खोलीत झोपलो, जेव्हा मला जाग आली तेव्हा मला भूक लागली म्हणून मी माझ्या नोकराकडे जेवण मागितले.

  जेवण मागितल्यावर नोकराची प्रतिक्रिया पाहून मला काहीच समजले नाही, त्यानंतर मी पुन्हा त्याच्याकडे खायला मागितले. पण ते  ऐकून तो ढसाढसा रडू लागला आणि म्हणाला की, तू दोन दिवसांनी जेवण मागितले आहेस. त्याचे बोलणे ऐकून मी म्हणालो की, मी काल रात्रीच झोपलो होतो. मग त्याने सांगितले की तू दोन दिवस सतत झोपेतच होतास. त्याचे म्हणणे ऐकून मला आधी विश्वास बसला नाही, त्यानंतर मी ड्रग्जचे सेवन करायचे नाही असे ठरवले. ड्रग्स ही चांगली गोष्ट नाही.

एका मुलाखतीत संजय दत्तने सांगितले होते की, मी खूप लाजाळू होतो. त्यामुळे मुलींसमोर कूल दिसण्यासाठी मी ड्रग्स घेण्यास सुरुवात केली. आपल्या आयुष्यातील 10 वर्षे ड्रग्जच्या व्यसनामुळे वाया गेल्याचेही त्याने सांगितले. जेव्हा मी ड्रग्ज घ्यायचो तेव्हा मी माझ्या खोलीत आहे की बाथरूममध्ये आहे हेही कळत नव्हते. ड्रग्ज ही चांगली गोष्ट नाही हे लक्षात येताच मी उपचार करून घेतले आणि मोठ्या कष्टाने या व्यसनातून बाहेर पडू शकलो.

संजू बाबाने असेही सांगितले की, व्यसनातून बाहेर पडण्यासाठी मी माझे लक्ष दुसरीकडे वळवले. तब्येत सुधारण्यासाठी जिममध्ये व्यायाम केला. काही महिन्यांपूर्वीच संजय दत्त ‘KGF 2’मध्ये दिसला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. याशिवाय त्यांचे ‘शमशेरा’ आणि ‘सम्राट पृथ्वीराज’ हे चित्रपट प्रदर्शित झाले पण ते बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. संजय दत्त लवकरच ‘द गॉड महाराजा’ आणि ‘घुडचडी’ या चित्रपटात दिसणार आहे.