सलमान खानच्या कानाखाली एका मुलीने वाजवली होती&#...

सलमान खानच्या कानाखाली एका मुलीने वाजवली होती… असं काय घडलं होतं?… (When Salman Khan Was Slapped Openly By A Girl, The Actor Did This Work In Anger)

आपल्या चाहत्यांमध्ये भाईजान म्हणून प्रसिद्ध असलेला सलमान खान वेगवेगळ्या प्रकारे चाहत्यांची मने जिंकत असतो. मध्यंतरी त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले असले तरी त्याची फॅन फॉलोइंग जराही कमी झालेली नाही. इतकेच नाही तर सलमान खानचे नाव कोणत्याही वादाशी जोडले गेले तरी त्याचे चाहते त्याला पाठिंबा देतात. तसे पाहायला गेले तर सलमान खान आणि वाद हे एक वेगळे समीकरण आहे. हिट अँड रन प्रकरण किंवा काळवीट प्रकरण अशा अनेक वादांमध्ये सलमान खानचे नाव समोर आले आहे. आज आम्ही तुम्हाला सलमान खानच्या आणखी एका वादाबद्दल सांगणार आहोत.

 एकदा दिल्लीतील एका मुलीने सलमान खानला सर्वांसमोर जोरदार कानाखाली मारली होती, ते पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण हैराण झाले होते. सलमान खानला कानाखाली मारण्याचे हे प्रकरण 2009 मधील आहे. त्यावेळी सलमान खान दिल्लीतील एका 5 स्टार हॉटेलमध्ये आपला भाऊ सोहेल खान, सुष्मिता सेन, विजेंदर सिंह आणि शिवानी कश्यपसह काही सेलिब्रिटींसोबत पार्टी करत होता. ती पार्टी त्या हॉटेलनेच आयोजित केली होती. तेथे फॅशन शोचेही आयोजन करण्यात आले होते. त्याच वेळी, एका बिल्डरच्या मुलीने तिच्या एका मित्रासह जबरदस्तीने त्या पार्टीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु ती यशस्वी होऊ शकली नाही. त्यानंतर ती एकटीच त्या पार्टीत घुसली. त्या मुलीचे नाव होते मोनिका.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या मुलीने फक्त सलमान खानला कानाखाली मारली नाही तर बाकीच्या सेलिब्रिटींनाही शिवीगाळ केली. तिची अवस्था पाहून ती दारूच्या नशेत असल्याचे जाणवत होते. सोहेल खानने त्या मुलीला  पार्टीत प्रवेश देऊ नये, अशी सूचना सुरक्षा रक्षकाला केली होती. पण जेव्हा त्या मुलीने गोंधळ घालायला सुरुवात केली तेव्हा तो गोंधळ ऐकून सलमान खान तिथे आला. सलमान खानसोबत सुष्मिता सेनही आली होती. अचानक त्या मुलीने सुष्मिता सेनला शिवीगाळ करायला सुरुवात केली.

त्या मुलीचे नियंत्रण सुटलेले पाहून सलमान खानने तिला नम्रपणे तिथून निघून जाण्यास सांगितले, मात्र रागाच्या भरात त्या मुलीने सलमान खानला कानाखाली मारली. यानंतर सलमान खानही चांगलाच संतापल्याचे बोलले जाते. मात्र त्यांने रागावर नियंत्रण ठेवत सुरक्षा रक्षकांना तिला पार्टीतून बाहेर काढण्यास सांगितले.