‘थोड्या दिवसांसाठी लग्न करीन; आयुष्यभर लग...

‘थोड्या दिवसांसाठी लग्न करीन; आयुष्यभर लग्नाची बेडी नको’ – सलमान खानचे अजब विचार (When Salman Khan Was Ready For Marriage For Some Time : Know What He Had Said About Life Long Relationship)

बॉलिवूडचा बॅचलर म्हणून नावाजलेला सलमान खान आता ५६ वर्षांचा झाला. पण लग्नाचे नाव नाही. म्हणून मुलाखतीत त्याला प्रश्न विचारला जातोच की, लग्न कधी करणार रे बाबा? आणि त्याचं उत्तर सलमान वेगवेगळं देतो. पण एकदा त्याने असं अजब उत्तर दिलं की, ‘मी थोड्या दिवसांसाठी लग्न करू शकतो, पण आयुष्यभर लग्नाची बेडी नको.’

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

एका पत्रकार परिषदेत अशाच पत्राचं त्यांनं विचित्र उत्तर दिलं होतं. तेव्हा सलमान समोर बसलेली एक महिला वार्ताहर म्हणाली की, मी पांढऱ्या ड्रेसमध्ये आहे. सल्लूमियांची इच्छा असेल तर माझ्याशी लग्न करू शकतो.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

त्या बाईने असा प्रस्ताव दिल्यावर सलमान मस्करी करण्याच्या मूडमध्ये आला. अन्‌ म्हणाला, ‘ठीक आहे. पण किती दिवसांसाठी हे लग्न करायचं? मी थोडे दिवस लग्न करू शकतो. कायमचा या बंधनात अडकून राहू शकत नाही.’

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सलमानच्या कामकाजाबाबत त्याने आपला वाढदिवस साजरा केल्यानंतर मीडियाला सांगितलं होतं की, ‘बजरंगी भाईजान’ ची पुढची आवृत्ती म्हणून ‘पवनपुत्र भाईजान’ मध्ये तो आहे. अन्‌ ‘नो एन्ट्री’ या गाजलेल्या विनोदी चित्रपटाच्या पुढील आवृत्तीमध्ये पण तो दिसेल.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

याशिवाय सलमान खानने सांगितले की शाहरुख खानचा ‘पठान’ त्याच्या ‘टायगर ३’ आधी प्रदर्शित होईल. ‘पठान’ मध्ये त्याची खास भूमिका आहे. तर ‘टायगर ३’ मध्ये शाहरूख खानची खास भूमिका आहे.