सलमान खानने वडिलांचा जाळला होता पगार, आईने दिली...

सलमान खानने वडिलांचा जाळला होता पगार, आईने दिली अशी कठोर शिक्षा (When Salman Khan Burnt His Father’s Salary, His Mother Punished Him for This Act)

बॉलिवूडमध्ये सलमान खान हा इंडस्ट्रीचा एक लोकप्रिय सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. त्याला लोक प्रेमाने भाईजान म्हणतात. सलमान खानचे आपल्या वडिलांवर म्हणजेच सलीम खानवर खूप प्रेम आहे. सलमान खानसुद्धा लहान असताना इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे मस्तीखोर होता. त्यामुळे कधी काही खोडसर पणा केला की त्याला त्याची आई चांगलचे रट्टे द्यायची. अलीकडेच ‘बिग बॉस 16’ मध्ये सलमान खानने आपल्या आयुष्याशी निगडित अनेक किस्से सांगितले.

मनीष पॉल सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ मध्ये भाईजानच्या वाढदिवसानिमित्त काही खास उपक्रम करण्यासाठी गेला होता. यादरम्यान सलमान खानने घरातील सदस्यांसोबत धमाकेदार डान्स परफॉर्मन्स केला, आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या तसेच त्याच्याबद्दलच्या सर्व प्रकारच्या अफवांवर प्रतिक्रिया दिल्या.

आपल्या आयुष्याशी निगडित किस्से शेअर करताना सलमान खानने सांगितले की, तो ६ वर्षांचा असताना त्याचे वडील इंदोरहून मुंबईत आले. त्या दिवसांत आर्थिक परिस्थितीमुळे वडिलांना घर चालवताना अडचणी येत होत्या. त्याचवेळी सलमान खानकडून नकळत एक मोठी चूक झाली.

सलमानने सांगितले की, दिवाळीतील दुपारची वेळ होती, तेव्हा मी टोपलीत काहीतरी जाळत होतो, ती आग जळवण्यासाठी मला तेव्हा कागदासारख्या गोष्टींची गरज होती. त्याचवेळी माझे वडील कागदासारखे काहीतरी ठेवत होते ते मी पाहिले. वडिल तेथून गेल्यावर मी ते कागद उचलून आणले आगीत टाकले. मात्र, नंतर ते कागद साधेसुधे नसून माझ्या वडिलांचा पगार असल्याचे मला नंतर समजले. मी 750 रुपये जाळले होते.

सलमानचे हे कृत्य जेव्हा त्याच्या आईला समजले तेव्हा त्यांनी त्याला खूप मार दिला. मात्र त्यांनी सलीम खान यांना घडल्याप्रकाराबद्दल काहीच सांगितले नाही. सलमानला तर त्यांनी खडसावले पण पैसे आगीत खाक झाल्यामुळे त्याच्या आईला त्या महिन्यात घर चालवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

आणखी एक किस्सा सांगताना सलमानने सांगितले की 1991 चा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘साजन’ दरम्यान मी एकावेळी 30 ते 35 पोळ्या खात असे. त्या काळात मी खूप दुबळा होता आणि माझे वजन खूप कमी होते, त्यामुळे मी खूप खायचो, पण आजच्या काळात सलमान खान एका आठवड्यातही इतक्या पोळ्या खाऊ शकत नाही.

सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर पुढील वर्षी त्याचे दोन चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहेत. त्याचे चाहते ‘टायगर 3’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.