एका दिग्दर्शकाने सैफ अली खानच्या थोबाडीत मारली,...

एका दिग्दर्शकाने सैफ अली खानच्या थोबाडीत मारली, अन् त्याचा नवाबाचा नक्षा साफ उतरला : चित्रपटाचे शूटिंगही थांबले (When Saif Ali Khan Was Slapped By A Director, The Shooting Of The Film Was Stopped)

सैफ अली खान हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता असला तरी त्याआधी तो नवाबी खानदानातला आहे. तो पतौडी संस्थानाचा वारस आहे. पण म्हणतात ना, काम चोख करत असताना तुमचे नवाबी थाट बाजूला ठेवावे लागतात. त्यानुसार सैफ अली खानला काम नीट जमत नाही, म्हणून एका दिग्दर्शकाची थप्पड खावी लागली होती.

तसं पाहायला गेलं तर सैफच्या खात्यावर बॉलिवूडचे चांगले चित्रपट जमा आहेत. त्याने काही चित्रपटात चांगला अभिनय करून आपली छाप पाडली आहे. त्यापैकी एक चित्रपट आहे ‘कच्चे धागे’. पण याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याला दिग्दर्शकाची थप्पड खावी लागली होती. या घटनेचा गौप्यस्फोट सदर चित्रपटाचे मारधाड दिग्दर्शकाने केला.

‘कच्चे धागे’च्या सेटवर आपण सैफ अली खानच्या थोबाडीत मारली होती, असे मारधाड दिग्दर्शक टिनू वर्मा यांनी सांगितले आहे. धावत्या रेल्वेगाडीत शूटिंग चालू होते. त्यासाठी ७ कॅमेरे लावण्यात आले होते. त्यात सैफचा सहभाग होता. एका दृश्यासाठी दिग्दर्शकाने ॲक्शन म्हणताच सैफ अली खान नाचायला लागायचा. वारंवार प्रयत्न करून देखील दिग्दर्शकाला परफेक्ट शॉट मिळत नव्हता. त्यामुळे शूटिंग थांबवावं लागलं. मारथाड दिग्दर्शकाने सैफला, नाचण्याचे कारण विचारले, तर तो म्हणाला, ट्रेनचा नादमय आवाज ऐकून नाचावेसे वाटते. हे ऐकताच टिनू वर्माच्या रागाचा पारा इतका चढला की, त्याने सैफ अली खानच्या थोबाडीत ठेवून दिली. ॲक्शन डायरेक्टरचा हात असा तगडा होता की, सैफ खाली पडला.

चित्रपटाचे शूटिंग तेव्हाच सुरू झाले, जेव्हा सैफने दिग्दर्शकाची माफी मागितली. टिनू वर्माने सांगितले की, सैफसोबत त्यची पत्नी अमृता सिंग होती. अमृताला घेऊन सैफने टिनूला सॉरी म्हटले. त्यावर टिनूने त्याला कानपिचक्या दिल्या की, बाबा रे, आयुष्यात प्रगती करायची असेल तर तुझ्या मनात तंत्रज्ञांबद्दल आदरभाव असला पाहिजे. अभिनेत्यांना सुपरस्टार बनविण्यात तंत्रज्ञांचा मोठा हात असतो. तेव्हा त्यांचा मान राखता येत नसेल तर त्यांच्यासोबत काम करू नकोस, नवाबाचा बेटा आहेस ना, पित्याने खूप काही कमावून ठेवलं आहे मग हे काम सोड. मेहनत कशाला करतोस? लोकांचा अपमान करू नकोस. सैफने टिनूची माफी मागून बरीच मनधरणी केल्यावर शूटिंग सुरू झालं.

सैफ अली खान हा पतौडींच्या नवाब घराण्याचा कुलदीपक आहे. त्याचे पिताजी मंसुर अली खान पतौडी त्याचे पूर्वज होते व उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. त्याची आई शर्मिला टागोर ६० ते ७०च्या दशकात सिनेसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्री होती. सैफने आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकून अभिनय क्षेत्र निवडले. अन्‌ आता तो या क्षेत्रातील नामांकित कलाकार आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम