विवाहबाह्य संबंधाच्या अफवा पसरुनही या अभिनेत्या...

विवाहबाह्य संबंधाच्या अफवा पसरुनही या अभिनेत्यांच्या पत्नींनी नाही सोडली आपल्या पतीची साथ (When Rumor of Extra Marital Affair of These Actors Broke Out, Wives Stood With Them in a Difficult Situation)

बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या रिलेशनशिप आणि ब्रेकअपच्या बातम्या नेहमीच पसरत असतात. या व्यतिरिक्तही अनेक कलाकारांच्या विवाहबाह्य संबंधाच्या बातम्या सुद्धा पसरतात. त्यापैकी काही बातम्या खऱ्या असतात तर काही फक्त अफवा असतात. पण याचा परिणाम अनेकदा अभिनेत्यांच्या वैवाहिक जीवनावर सुद्धा होतो. पण त्यातील काही कलाकार इतके नशिबवान असतात की, त्यांच्या पत्नी कठीण प्रसंगात नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांची बाजू उचलून धरतात.
अमिताभ बच्चन


मेगास्टार अमिताभ बच्चन आणि एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्या अफेअरच्या बातम्या अनेक वर्षांपासून ऐकायला मिळत होत्या. अमिताभ यांनी रेखासोबतच्या विवाहबाह्य संबंधांच्या बातम्यांचे नेहमीच खंडन केले असले तरी रेखाने नकळत ते मान्य केले आहे. मात्र, त्यांच्या अफेअरच्या चर्चा असूनही, जया बच्चन नेहमीच आपला पती अमिताभ बच्चन यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांनी कधीही पतीची साथ सोडली नाही.

शाहरुख खान

बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणारा बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानही त्याच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत आला आहे. त्यांचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते . मात्र नंतर त्या अफेअरच्या बातम्या निव्वळ अफवा ठरल्या. विशेषत: शाहरुख खान आणि प्रियंका चोप्राच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी मीडियामध्ये आल्या होत्या, पण या बातम्यांचा शाहरुखची पत्नी गौरी खानवर काहीही परिणाम झाला नाही. ती आपल्या पतीच्या पाठीशी उभी राहिली.


अक्षय कुमार

खिलाडी अक्षय कुमारचे नाव लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. जेव्हा त्यांचे नाव प्रियांका चोप्राशी जोडले गेले तेव्हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही थोडा परिणाम दिसून आला होता. परंतु त्यांची पत्नी ट्विंकल खन्ना हिने हिंमत न गमवता आपल्या पतीवर विश्वास ठेवला. आज दोघेही आपल्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत.


गोविंदा

बॉलिवूडचा हिरो नंबर वन म्हटला जाणारा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा याने अभिनेत्री नीलमसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यादरम्यान त्यांच्या अफेअरच्या बातम्याही खूप गाजल्या, पण त्यांची पत्नी सुनीता यांनी त्यांची साथ सोडली नाही. राणी मुखर्जीसोबतही गोविंदाचे नाव जोडले गेले होते, तरीही त्यांची पत्नी सुनीता पूर्ण आत्मविश्वासाने पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.


आदित्य पंचोली

बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली आणि कंगना रणावत यांच्याबद्दल फारसे कोणाला माहिती नाही. मात्र कंगना आदित्य पांचोलीसोबत लिव्ह-इनमध्ये राहिल्याच्या बातम्याही मीडियामध्ये आल्या होत्या, पण नंतर दोघेही वेगळे झाले. हे सर्व समोर आल्यानंतरही आदित्य पांचोलीची पत्नी झरीना वहाब नेहमीच त्याच्यासोबत होती. विशेष म्हणजे त्याला सोडून जाण्याचा विचार सुद्धा झरीनाच्या मनात आला नाही.


शत्रुघ्न सिन्हा


हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचे अनेकवेळा रीना रॉय यांच्याशी नाव जोडले गेले आहे. असे म्हटले जाते की दोघेही रिलेशनशिपमध्ये होते आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या लग्नानंतरही अनेकदा त्यांच्या जवळीक निर्माण झाली होती. मात्र त्यांची पत्नी पूनम सिन्हा यांनी कधीही पतीची साथ सोडली नाही आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला.