सोनम कपूरला रंगावरुन नातेवाईकांनीच केले होते ट्...

सोनम कपूरला रंगावरुन नातेवाईकांनीच केले होते ट्रोल, अभिनेत्रीने लग्नाबाबत केला खुलासा (When Relatives Made Lewd Comments on Sonam Kapoor’s Complexion, Said This About Actress’s Marriage)

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनिल कपूर यांची मोठी मुलगी सोनम कपूर सध्या पती आनंद आहुजासोबत आपले वैवाहिक जीवन सुखाने जगत आहे. अलीकडेच, सोनम कपूरने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला. त्याचे नाव वायू कपूर आहुजा असे ठेवले आहे. सोनम कपूरने खूप दिवस डेट केल्यानंतर आनंद आहुजासोबत लग्न केले हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण सोनम कपूरला तिच्या रंगावरून नातेवाईकांनी अनेकदा ट्रोल केले होते.

 काही वर्षांपूर्वी सोनम कपूरने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, एक काळ होता जेव्हा लोक माझी उंची आणि माझ्या रंगाबाबत असभ्य कमेंट करायचे. नातेवाईक तर माझ्या रंगावरुन हिच्याशी कोण लग्न करणार असेही म्हणायचे.

मला अनेकदा टोमणे मारायचे आणि म्हणायचे की ही इतकी काळी आहे. खूप उंच आहे. लोक काय म्हणतील आणि कोण हिच्याशी लग्न करेल? एका मुलाखतीत सोनमने सांगितले होते की, किशोरवयात मला खूप हार्मोनल समस्या होत्या, त्यामुळे माझ्या शरीरावर खूप केस आणि पिंपल्स होते. एवढेच नाही तर माझे वजनही खूप वाढले होते. मात्र, कालांतराने माझ्याबाबतीतली नातेवाईक आणि लोकांची मते बदलली.

सोनम कपूरने 2007 मध्ये ‘सावरिया’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात सोनमसोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसला होता. असे म्हटले जाते की, सोनम कपूरचे चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी वजन 80 किलो होते, परंतु संजय लीला भन्साळी यांनी तिला पदार्पणापूर्वी वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता, त्यानंतर सोनम कपूरने आहार आणि व्यायामाच्या मदतीने आपले वजन मोठ्या प्रमाणात कमी केले.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनमने संजय लीला भन्साळींनी दिलेला सल्ला गांभीर्याने घेतला आणि सुमारे दोन वर्षांच्या मेहनतीनंतर 35 किलोपर्यंत वजन कमी केले. वजन कमी केल्यानंतर तिने ‘सावरिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर या अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली.

तसे, सोनम कपूर बॉलिवूडच्या बोल्ड आणि स्पष्टवक्त्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते, ती कधीही सर्वांसमोर आपले मत उघडपणे व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाही. याशिवाय तिला इंडस्ट्रीची स्टाइल दिवा म्हणूनही ओळखले जाते. सोनमने 2018 मध्ये आनंद आहुजासोबत लग्न केले होते.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम