सेक्स केल्याशिवाय कोणतीही बाई पुरुषाशी जवळीक सा...

सेक्स केल्याशिवाय कोणतीही बाई पुरुषाशी जवळीक साधत नाही; रेखाच्या या विधानावर खळबळ माजली होती… (When Rekha Gave A Sensational Statement On Relationship – ‘A Woman Can’t Get Close To Man Without Sex’)

अभिनेत्री रेखा म्हणजे सुंदर, ग्लॅमरस्‌, बिंदास आणि गुणी कलाकार. तिच्या भूमिकांप्रमाणेच तिची प्रेमप्रकरणे आणि लग्ने गाजलीत. रेखाच्या जीवनात बरेच पुरुष आले. पण त्यांच्याशी तिचे संबंध आयुष्यभर काही टिकले नाहीत.

अभिनयाच्या क्षेत्रात रेखा टॉपवर होती, तेव्हा तिच्या प्रेमप्रकरणांच्या चर्चा खूप रंगायच्या. त्याचप्रमाणे स्त्री-पुरुष संबंध आणि सेक्स या विषयावर तिनं जे काही भाष्य केलं होतं, ते आजही चर्चेत आहे.

रेखाच्या आत्मचरित्रात अशा कित्येक ऐकीव आणि न ऐकलेल्या घटनांचा उल्लेख आहे, ज्याची लोकांना माहिती नव्हती. पुरुषांशी ठेवलेल्या संबंधांबाबत देखील तिने या पुस्तकात मनमोकळेपणाने चर्चा केली आहे. पुरुष आणि शारीरिक संबंध यावर रेखाने भाष्य केलं होतं.

या पुस्तकातील मजकुराप्रमाणे, रेखा एका फिल्मी पत्रकाराशी बातचीत करताना बोलली होती की, कोणत्याही बाईला पुरुषाशी जवळीक साधायची असेल तर ती सेक्सच्या मदतीनेच साधू शकते. जोपर्यंत स्त्री, पुरुषाशी सेक्स करत नाही, तोपर्यंत ती त्याची जीवलग होऊ शकत नाही. रेखाने केलेल्या या भाष्यावर तेव्हा खूपच खळबळ माजली होती. लोकांना तिचे हे बेताल भाष्य आवडले नव्हते व त्यांनी मोठाच गजहब केला होता.

या व्यतिरिक्त रेखाने सेक्ससंबंधात मोकळेपणाने विधाने केली आहेत. असंच एक विधान तिच्या पुस्तकात आहे. लग्नाआधी सेक्स करणे अगदी स्वाभाविक आहे, असं सांगून तिनं बरीच खळबळ माजवली होती. लग्नाआधी सेक्स करण्याबाबत तिनं सहमती दर्शविली होती. अन्‌ हे चूक आहे, असं जे लोक बोलत असतील, ते ढोंगी आहेत, असं ही सांगितलं होतं.

अशा तऱ्हेची बोल्ड-बिंदास विधाने रेखाने तेव्हा बरेचदा दिली होती. अन्‌ कितीतरी पुरुषांशी रिलेशनशिपमध्ये राहिली. तिच्या या विधानांमुळेच विनोद मेहराच्या आईने तिला सून म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता, असाही बोलबाला आहे. लग्न केल्यावर रेखा जेव्हा विनोद मेहराच्या पाया पडू लागली, तेव्हा सासुबाईंनी तिला ढकलून दिलं, असंही सांगितलं जातं. रेखाला मारण्यासाठी तिनं चप्पल देखील उगारली. अन्‌ घरात येण्यास मनाई केली.

रेखाची अभिनय कारकीर्द तर खूपच सफल होती, पण तिचे खासगी जीवन असफल राहिले. तिनं ज्या पुरुषांशी संबंध ठेवले त्यावर खूपच जास्त चर्चा झडल्या, गॉसिप केले गेले. तरीपण तिचे हे संबंध कोणी समजू शकले नाही. खुद्द रेखालाही ते समजले नाहीत. अमिताभ बच्चनशिवाय रेखाचं नाव नवीन निश्चल, विश्वजीत, जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, विनोद मेहरा, संजय दत्त, अक्षय कुमार अशा अनेक अभिनेत्यांशी जोडलं गेलं. पण यापैकी कोणीही संबंध टिकवले नाहीत. तिनं बिझनेसमन मुकेश अग्रवालशी साग्रसंगीत लग्न केलं. पण तेही टिकलं नाही. उलट मुकेशने आत्महत्या केली. तेव्हा सर्वांनी रेखालाच दोष दिला. पण हे सर्व वाद-विवाद बाजूला सारून रेखा आजही बिंदासपणे आणि सुखात जीवन जगते आहे.