आमीर खानच्या प्रेमात पडते की काय? अशी भिती राणी...

आमीर खानच्या प्रेमात पडते की काय? अशी भिती राणी मुखर्जीला वाटली होती…(When Rani Mukherji Was Tormented By The Fear Of Falling In Love With Aamir Khan)

‘बंटी और बबली २’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने राणी मुखर्जी चर्चेत आली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राणी सह शर्वरी वाघ, सैफ अली खान, सिद्धांत चतुर्वेदी हे कलाकार कपिल शर्मा शो मध्ये एकवटले होते. तेव्हा आपल्या जीवनातील अज्ञात गोष्टी त्यांनी उघड केल्या.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

राणी मुखर्जीने आपल्या जीवनातील काही अज्ञात गोष्टी सांगितल्या. त्यानुसार राणीने सांगितले की, आमीर खान सोबत चित्रपट करताना, मला सतत भिती वाटत होती की, मी त्याच्या प्रेमात पडते की काय?

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

सुरुवातीच्या काळात शाहरूख आणि आमीर हे दोन्ही खान आपले आवडते कलावंत होते, असं सांगून राणी म्हणाली – “पण आमीर खान सोबत काम करण्याची वेळ आली, तेव्हा मी खूपच घाबरले होते. त्याच्या बरोबर रोमॅन्टिक सीन करताना मला घाम फुटला होता. आमीरच्या डोळ्यात बघताना अशी भिती दाटून आली होती की, याच्यावर माझं प्रेम तर बसणार नाही ना?”

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

याच शो मध्ये राणी मुखर्जीने सांगितले की, शाहरूखचा ‘दिलवाले दुल्हनियां -’ आणि आमीरचा ‘कयामत से कयामत तक’ हे चित्रपट पाहून ती त्यांची दिवानी झाली होती. तेव्हा ती १६-१७ वर्षांची होती.

राणीचा ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट याच आठवड्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. २००५ साली आलेल्या ‘बंटी और बबली’ या चित्रपटाचा हा पुढचा आविष्कार आहे. त्यामध्ये अभिषेक बच्चन होता.