रणबीर कपूरच्या एका चाहतीने केले होते त्याच्याशी...

रणबीर कपूरच्या एका चाहतीने केले होते त्याच्याशी लग्न , अभिनेत्याने स्वत:च सांगितला किस्सा (When Ranbir Kapoor’s Female Fan Had Married Him, The Actor Narrated An Interesting Anecdote)

अभिनेता रणबीर कपूरने यावर्षी त्याची प्रेयसी अभिनेत्री आलिया भट्टसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नामुळे अनेकांना आनंद झाला पण रणबीरच्या काही महिला चाहत्यांची मनं मात्र दुखावली गेली. पण समजा तुम्हाला असे कोणी सांगितले की आलिया ही रणबीरची पहिली पत्नी नाही तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. पण हे दुसरेतिसरे कोणी नाही तर खुद्द रणबीरनेच सांगितले की, त्याची पहिली पत्नी आलिया नसून दुसरीच एक मुलगी होती.

रणबीर तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. त्याचे शमशेरा आणि ब्रम्हास्त्र हे दोन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. शिवाय त्याच्या लग्नामुळे सुद्धा तो चर्चेत आहे. पण एका मुलाखतीत रणबीरने एक जबरदस्त खुलासा करत सगळ्यांनाच धक्का दिला. रणबीरने आलियाच्या आधी त्याचे एकीशी लग्न झाल्याचे सांगितले व पुढे त्याच्या पहिल्या लग्नाचा एक मजेशीर किस्सा सांगितला. रणबीर म्हणाला की , ‘एक मुलगी त्याच्या प्रेमात इतकी वेडी झालेली की तिला त्याच्याशी लग्न करायचे होते. पण ते शक्य नसल्यामुळे तिने रणबीरच्या बिल्डिंगच्या मेन गेट सोबतच लग्न केले.’

रणबीर पुढे म्हणाला की, ‘ती मुलगी भटजींना घेऊन आली आणि तिने गेट सोबत लग्न केले. जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा त्या गेटला टिळा लावला होता आणि आजूबाजूला फुलं पडली होती. तसे पाहायला गेल्यास मी अजून माझ्या पहिल्या पत्नीला भेटलेलो नाही. पण मी तिला एकदा नक्की भेटेन.’ रणबीरने सांगितलेल्या या किश्श्यांनतर लोक त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव गूगलवर सर्च करत आहेत.

रणबीरने लग्नापूर्वी आलियाबद्दल कोणतेच विधान केले नव्हते. पण शमशेरा या त्याच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजवेळी रणबीरने सांगितले की, हे वर्ष माझ्यासाठी सर्व दृष्टीने महत्वाचे आहे कारण माझे दोन मोठे चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहेत. शिवाय माझे या वर्षी लग्नसुद्धा झाले. मी माझ्या चित्रपटात नेहमी बोलतो की ‘’जीवनात आपल्याला वरण भातासोबत तंगडी, कबाबची पण गरज असते. पण खूप साऱ्या अनुभवांनंतर आता मी हे म्हणेन की, वरण भातापेक्षा चांगले काही नाही. आलिया माझ्यासाठी वरण भातावरची फोडणी तसेच सोबतचे लोणचे, कांदा सगळं काही आहे. मी माझ्या आयुष्यात तिच्याहून चांगली जोडीदार मागूच शकत नाही.’’ सध्या सगळीकडे रणबीरच्या या उत्तराचे कौतुक होत आहे.