रणबीर कपूरने कतरीना कैफचा सर्वांसमोर केला होता ...

रणबीर कपूरने कतरीना कैफचा सर्वांसमोर केला होता अपमान (When Ranbir Kapoor Publicly Insulted Katrina Kaif)

अभिनेत्री कतरीना कैफ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती आपल्या अभिनय आणि नृत्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. याशिवाय तिची लव्ह लाईफही नेहमीच चर्चेत असायची. एकेकाळी सलमान खानसोबतची वाढती जवळीक तर नंतर रणबीर कपूरसोबतचे अफेअर यामुळे तिच्याबाबत बऱ्याच चर्चा रंगायच्या. सध्या ती विकी कौशलसोबत आपले वैवाहिक आयुष्य आनंदाने जगत आहे. जेव्हा रणबीर आणि कतरीनाच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते तेव्हा रणबीरने कतरीनाचा सर्वांसमोर अपमान केला होता.

रणबीर कपूरला काही काळ डेट केल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले होते. कतरीना कैफने रणबीर कपूरसोबत ‘जग्गा जासूस’, ‘अजब प्रेम की गज़ब कहानी’ आणि ‘राजनीती’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटांच्या प्रमोशनदरम्यान रणबीर कपूरने कतरीना कैफचा अनेकदा अपमान केला होता.

एकदा एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणबीर कपूर कतरीना कैफचे कौतुक करत होता. त्याचवेळी कतरीनालाही काहीतरी बोलायचे होते तेव्हा रणबीर म्हणाला, कौतुक झाले, आता अजून काही उचापती करु नकोस.

यानंतर, जेव्हा पुन्हा एकदा कतरीना चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल सांगत होती, तेव्हा रणबीरने “मी निर्माता आहे आणि मी याबद्दल बोलू शकतो” असे म्हणत तिच्या बोलण्यात व्यत्यय आणला.

एवढेच नाही तर एकदा रणबीर कपूरने मर्यादा ओलांडल्या होत्या. त्याने आपल्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये कतरीनाची निवड केलीच नाही पण त्या यादीत आपल्या पाळीव कुत्र्यांची निवड केली होती. त्यामुळे कतरीनालाही खजील झाल्यासारखे झाले होते.

कतरीना कैफ आणि रणबीर कपूर यांच्यात आता क्वचितच संवाद होत असेल. आता ते कधीच एकत्रही दिसत नाहीत. दोघेही आपापल्या आयुष्यात पूर्णपणे आनंदी आहेत. कतरीनाची विकी कौशलसोबतची जोडी सर्वांनाच आवडते.