राजकुमार रावला बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी कर...

राजकुमार रावला बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी करावा लागला होता संघर्ष (When Rajkumar Rao Did not Even have Money for Food in Struggle Days, Know How He Got His First Film)

राजकुमार रावने खूप कमी वेळात बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. राजकुमार आज ज्या ठिकाणी आहे तिथे पोहचण्यासाठी त्याने बराच संघर्ष केला आहे. एक काळ असा होता की राजकुमार त्याचा संपूर्ण दिवस पार्ले-जी ची बिस्किटं खाऊन काढत होता. सध्या राजकुमार राव त्याचा आगामी चित्रपट ‘हिट द फर्स्ट केस’ साठी चर्चेत आहे. हा चित्रपट १५ जुलै रोजी प्रदर्शित होईल. सध्या तो त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

प्रमोशन दरम्यानच्या मुलाखतीत राजकुमारने त्याच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण शेअर केली. अभिनेत्याने सांगितले की, त्याच्या आयुष्यात एक काळ इतका बिकट होता की त्याला साधे दोन वेळचे जेवण पण नीट मिळत नव्हते. तेव्हा तो पार्ले जीचा फक्त एक बिस्किटचा पुडा खाऊन दिवस काढायचा. एवढेच नव्हे तर त्याच्या अकाउंटमध्ये केवळ १८ रुपये होते. राजकुमारने बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मीडियाशी बोलताना राजकुमार म्हणाला, ‘एक इंडस्ट्री बाहेरचा माणूस म्हणून मलाही इंडस्ट्रीत येण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. मला चित्रपटांची खूप आवड आहे, त्यामुळे मी लहानपणापासूनच अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, जेव्हा मी अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलो तेव्हा मला वास्तवाची जाणीव झाली. राजकुमार रावने २०१० मध्ये ‘लव्ह सेक्स और धोका’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली.

त्यांच्या संघर्षाच्या दिवसांत अचानक एके दिवशी त्याने दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांची चित्रपटासाठी अभिनेत्याच्या शोधात आहे अशी जाहिरात पाहिली, ती जाहिरात पाहून राजकुमार राव थेट त्यांच्या कार्यालयात पोहोचला. तिथे पोहोचल्यानंतर त्याने ऑडिशन दिली आणि अखेर बऱ्याच संघर्षानंतर त्याला ‘लव्ह सेक्स और झोका’ या पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली. त्यानंतर तो अनेक चित्रपटात दिसला.

राजकुमार रावच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, नोव्हेंबर २०२१ मध्ये चंदीगडमध्ये गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत त्याने लग्न केले. लग्नापूर्वी राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी एकमेकांना अनेक वर्षे डेट केले. दोघे लिव्ह-इनमध्ये राहत होते. सध्या राजकुमार राव त्याच्या ‘हिट द फर्स्ट केस’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.