शाळेत असताना प्रियंकाच्या बॉयफ्रेंडने असे काही ...

शाळेत असताना प्रियंकाच्या बॉयफ्रेंडने असे काही केले ज्यामुळे अभिनेत्रीला आपले लग्न झाल्याचा भास झाला (When Priyanka Chopra’s Boyfriend Did Such Act in School, Actress Felt That She Got Married)

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार  अभिनयाचा ठसा उमटवणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रियंका सरोगसीच्या माध्यमातून एका मुलीची आई झाली. तिने आपल्या मुलीचे नाव मालती मेरी असे ठेवले. सध्या ती आई म्हणून आपल्या लेकीची काळजी घेण्यात व्यस्त असते.

प्रियांकाचा पती निक जोनास हा तिचे पहिले प्रेम नव्हता. कारण त्याच्या आधी अभिनेत्रीचे नाव अनेकांशी जोडले गेले होते. एका मुलाखतीत, अभिनेत्रीने आपल्या शाळेतील प्रेमाबद्दल खुलेपणाने सांगितले होते की, एकदा तिच्या प्रियकराने असे काही केले ज्यामुळे तिला आपले लग्न झाले असेच वाटले होते.

प्रियंकाचे शालेय शिक्षण अमेरिकेत झाले. त्यावेळी तिचे एका मुलासोबत अफेअर होते. प्रियंकाने सांगितले की, जेव्हा मी नॉर्थ सेंट्रल हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेत होती, तेव्हा मी मावशीच्या घरी राहायची. नववीत असताना मी एका मुलाच्या प्रेमात पडले. मी त्याला डेट करत होती तेव्हा त्याची ओळख लपवण्यासाठी मी त्याचे नाव बॉब असे सांगितले होते.

मी नववीत होती तेव्हा बॉब 10वीत होता. तो फुटबॉल खूप चांगला खेळायचा त्यामुळे मी त्याच्या प्रेमात पडली होती. तोही माझ्यासाठी माझ्या वर्गाबाहेर उभा राहून माझ्य़ाकडे बघत हातवारे करायाचा. बॉबने एकदा आपल्या गळ्यातील सोन्याची चैन काढून माझ्या गळ्यात घातली होती. त्याच्या अशा कृत्याने मी खूपच अवाक्  झाली. त्यावेळी मला आमचे लग्न झाल्यासारखेच वाटले.