एका लेस्बियन मुलीने प्रियंका चोप्राला केलं होतं...

एका लेस्बियन मुलीने प्रियंका चोप्राला केलं होतं प्रपोज, अभिनेत्रीने अशी हाताळली परिस्थिती (When Priyanka Chopra was Proposed by a Lesbian Girl, Know How Actress Handled The Situation)

प्रियंका चोप्रा हे नाव बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये एक उत्तम अभिनेत्री म्हणून घेतलं जातंच; पण आता प्रियंकाकडे एक ग्लोबल आयकॉन म्हणून पाहिलं जातं. नुकतीच ती सरोगसीद्वारे आई झाली आहे. सध्या ती पती निक जोनस आणि मुलगी मालती मैरी सोबत आपलं सुखी कौटुंबिक जीवन जगत आहे. लग्नाआधी प्रियंकाचे बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडले गेले, परंतु प्रियंका चोप्राचं सौंदर्य पाहून एका लेस्बियन मुलीने प्रियंका चोप्राला प्रपोज केलं होतं. त्या प्रसंगी प्रियंकाने नेमकी कशी परिस्थिती हाताळली होती, याचा खुलासा तिने स्वतःच केला होता.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

सध्या करण जोहरचा कॉफी विथ करण हा कार्यक्रम लोकप्रिय होत आहे. या कार्यक्रमाचे ७ वे पर्व सध्या करण होस्ट करत आहे. या दरम्यान प्रियंका चोप्रा बाबतचा एक मजेदार किस्सा समोर आला आहे. प्रियंका चोप्रा २०१४ मध्ये कॉफी विथ करण (Koffee With Karan) या कार्यक्रमात आली होती. त्यात तिने एका लेस्बियन मुलीने तिला प्रपोज केल्याचा किस्सा सांगितला होता. त्यावेळी तिला त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी खोटं बोलावं लागलं होतं.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

त्या कार्यक्रमात दीपिका पादुकोनही प्रियंकासोबत आली होती. त्यावेळेस करणने प्रियंकाला तुझे कधी लेस्बियन एनकांऊटर झाले आहे का? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना प्रियंकाने सांगितले की एनकाऊंटरचं माहीत नाही, परंतु एका मुलीने मला प्रपोज केले होते.

याबाबतचा खुलासा करताना प्रियंकाने सांगितलं, की ती एका नाइटक्लब मध्ये गेली असता तिथे एक मुलगी तिला इम्प्रेस करायचा प्रयत्न करत होती. त्या मुलीने तिला प्रपोज केलं होतं. प्रियंका तिला आधीपासून ओळखत होती. त्यामुळे तिला कसा नकार द्यावा हे प्रियंकाला कळत नव्हतं. मग त्या मुलीला टाळण्यासाठी आपल्याला आधीच बॉयफ्रेंड असून मला मुलंच आवडत असल्याची खोटी कहाणी तयार करून तिला सांगितली, असं प्रियंका म्हणाली. त्या वेळी प्रियंकाला ना बॉयफ्रेंड होता ना ती कोणत्या रिलेशनशिपमध्ये होती; पण तरीही तिने त्या मुलीला टाळण्यासाठी तसं सांगितलं होतं. हा किस्सा आठवून प्रियंकाला आजही हसू येतं.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

प्रियंकाच्या कामाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास अभिनेत्रीने नुकतेच रुसो ब्रदर्ससोबत ‘सिटाडेल’ या वेब सीरिजचे शूटिंग पूर्ण केले. याशिवाय ती लवकरच ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ या चित्रपटात दिसणार आहे. दुसरीकडे, फरहान अख्तर आणि आदर्श गौरवसोबत ‘द व्हाईट टायगर’ या चित्रपटात शेवटची दिसलेली प्रियंका चोप्रा ‘जी ले जरा’ या बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे, ज्यात कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील आहेत.