प्रियकराचे चुंबन घेताना रंगहात पकडली गेली प्रिय...

प्रियकराचे चुंबन घेताना रंगहात पकडली गेली प्रियंका, अभिनत्रीने सांगितला पहिल्या चुंबनाचा अनुभव (When Priyanka Chopra was Caught by Aunty Before Kissing Her Boyfriend)

बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या तिच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत पती निक जोनससोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या जोडीने त्यांच्या या सहलीतले रोमॅण्टिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. निकसोबत लग्न करण्यापूर्वी प्रियंकाचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले होते. पण खरेतर वयाच्या 14 व्या वर्षी प्रियंका पहिल्यांदा प्रेमात पडली होती. तेव्हा ती तिच्या प्रियकराला किस करणार तितक्यात तिच्या काकीने तिला रंगेहात पकडले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका 14 वर्षांची असताना तिचा एक बॉयफ्रेंड होता. त्याचे नाव बॉब असे होते. प्रियंका तेव्हा शाळेत जायची. प्रियंकाने सांगितले की, तेव्हा तिला बॉबने सोन्याची चैन भेट दिली होती. प्रियंकाने तिच्या पहिल्या चुंबनाचा अनुभव तिच्या  ‘अनफिनिश्ड’या पुस्तकात लिहिला आहे. तिने पुस्तकात लिहिले की , तिला आजही तिचे पहिले चुंबन आठवते. तो अनुभव तिच्यासाठी एकदम वाईट होता. प्रियंकाने सांगितले की, जेव्हा ती बॉबसोबत घरात एकटीच होती आणि ते दोघे एकमेकांचे चुंबन घेणार होते तेव्हा तिथे अचानक तिची काकी आली. काकी आल्याचे समजताच प्रियंका एकदम घाबरली आणि तिने लगेच बॉबला कपाटात लपवले. पण काकीने त्याला पकडलेच आणि प्रियंकाचे गुपित उघडकीस आले.

काकीला प्रियंकाचा खूप राग आलेला. तिने रागात प्रियंकाची आई मधू चोप्राला सर्व घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा तिच्या आईला पण राग आला पण तो राग प्रियंकाचा बॉयफ्रेंड आहे म्हणून नव्हता तर ती बॉयफ्रेंडसोबत पकडली गेली याचा राग होता.

या घटनेनंतर मधू चोप्रा यांनी प्रियंकाला न्यूटनला तिच्या मामा मामीकडे राहायला पाठवले. पण तिथे जाऊनही तिचे व तिच्या बॉयफ्रेंडचे संबंध कायम होते. जेव्हा तिच्या मामाला ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी देखील तिचे व बॉबचे नाते संपवण्याचा प्रयत्न केला.

पण कालांतराने प्रियंकाला तिची एकदम खास मैत्रीण तिच्या बॉयफ्रेंडला डेट करत असल्याचे समजले तेव्हा मात्र त्यांच्या नात्यात खरा दुरावा आला.