पलक तिवारीने कॅमेऱ्यासमोर केला होता विचित्रपणा ...

पलक तिवारीने कॅमेऱ्यासमोर केला होता विचित्रपणा (When Palak Tiwari did Such an Act in Front of Camera, Actress Told the Shocking Reason)

श्वेता तिवारीची लाडकी लेक पलक तिवारीही टॉप मॉडेलपैकी एक मानली जाते. ती आपल्या पदार्पणाच्या आधीपासूनच खूप चर्चेत आहे. फिल्मी दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वीच पलकची जबरदस्त फॅन फॉलोइंग झाली आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच पलकला आपल्या म्युझिक व्हिडिओंसाठी चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले. पलक अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण एकदा कॅमेऱ्यासमोर विचित्रपणा केल्यामुळे ती चर्चेत आली होती. त्यानंतर पलकने याबाबत खुलासाही केला.

पलक एकदा सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत दिसली होती. ती त्याच्यासोबत कारमधून बाहेर जात होती. पण पापाराझींची नजर त्यांच्यावर पडलीच आणि त्यांनी पलक व इब्राहिमला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेतली. पण त्या दोघांनी आपला चेहरा कॅमेऱ्यात दिसू नये यासाठी हाताने झाकून घेतला.

या घटनेनंतर पलक आणि इब्राहिम एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु झाली. पण भलेही ते दोघे एकमेकांना डेट करत असले तरी त्यांनी कॅमेऱ्यापासून आपला चेहरा का लपवला हा प्रश्न सगळ्यांना पडला.

पण नंतर पलकने याबाबत एका मुलाखतीत खुलासा केला. ती म्हणाली की, माझी इब्राहिम अली खानसोबत सहज भेट झाली होती. आमच्यात डेटिंग किंवा अफेअर असे काहीही नाही, आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. आम्ही फक्त बाहेर जात असतानाच पापाराझींनी आम्हाला गाठलं.

पलक पुढे म्हणाली की, त्यावेळी मी कुठे जातेय वगैरे आईला सांगितलं नव्हतं त्यामुळे पापाराझी येताच मी तोंड लपवलं.

पलकच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिला आतापर्यंत अनेक टीव्ही शोच्या ऑफर आल्या आहेत, पण तिचे संपूर्ण लक्ष बॉलिवूडवर आहे. पलक लवकरच ‘रोझी: द सेफ्रॉन चॅप्टर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विवेक ओबेरॉयने काम केले आहे. याशिवाय पलक सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळेही चर्चेत आहे.