दीपिका पादुकोणच्या प्रेमात आकंठ बुडाला होता नील...

दीपिका पादुकोणच्या प्रेमात आकंठ बुडाला होता नील नितीन मुकेश(When Neil Nitin Mukesh Fell in Love with Deepika Padukone, Did Such Work Outside Actress’s House)

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये, चित्रपटांमध्ये एकत्र काम करणार्‍या कलाकारांची जवळीक वाढणे किंवा त्यांचे अफेअर असणे खूप सामान्य गोष्ट आहे. एकत्र काम करणाऱ्या कलाकारांच्या अफेअरच्या बातम्या अनेकदा ऐकायला मिळतात, मात्र त्यातील काही नातीच लग्नापर्यंत पोहोचतात, तर बहुतांश नाती काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी संपतात. एक काळ असा होता की बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश आणि दीपिका पादुकोण यांच्या अफेअरच्या बातम्या मीडियामध्ये चर्चेत होत्या. नीलला दीपिकाच्या प्रेमाची इतकी भुरळ पडली होती की, एके दिवशी त्याने अभिनेत्रीच्या घराबाहेर पोहोचल्यानंतर तब्बल 3 तास वाट पाहिली.

2007 मध्ये ‘जॉनी गद्दार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या नील नितीन मुकेशला नील माथूर या नावानेही ओळखले जाते. यानंतर त्याने आणखी अनेक चित्रपटांमध्ये काम केले, परंतु तो आघाडीचा अभिनेता बनू शकला नाही, त्याच्या अनेक कथा खूप प्रसिद्ध झाल्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे दीपिका पादुकोणचे वेड आणि तिच्या घराबाहेर 3 तास वाट पाहत थांबणे.

नील नितीन मुकेशने 2010 मध्ये ‘लफंगे परिंदे’मध्ये काम केले होते, त्यात त्याच्या विरुद्ध दीपिका पादुकोण दिसली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दीपिका आणि नील यांच्यात जवळीक वाढली होती. त्यांच्या अफेअरच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. खुद्द अभिनेत्याने एकदा याबाबत संकेत दिले होते.

दीपिका आणि नीलच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत होत्या. त्याचवेळी, अभिनेत्याने एक ट्विट केले होते आणि त्यात लिहिले होते – मी काल दीपिकाच्या घराबाहेर तीन तास लाल गुलाब घेऊन उभा होतो. एवढ्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ती ‘आरक्षन’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली असावी, असे लक्षात आले. या ट्विटमध्ये दीपिकाबद्दलच्या भावना व्यक्त करून अभिनेत्याने अनेकांची वाहवा मिळवली.

रिपोर्ट्सनुसार, नीलने एका मुलाखतीत सांगितले होते की, दीपिका त्याच्या ओळखीच्या सर्वात गोड लोकांपैकी एक आहे. ती त्याच्यासाठी कुटुंबासारखी आहे, ती त्याची अशी मैत्रीण आहे जिच्यासोबत तो रात्रीअपरात्रीही काहीही बोलू शकतो. अभिनेत्रीच्या स्मितहास्याचे कौतुक करताना तो म्हणाला होता की तिचे हास्य हृदय पिळवटून टाकणारे आहे आणि मला ती खूप आवडते.

दुसरीकडे दीपिका पादुकोणनेही एका मुलाखतीत सांगितले की, नीलसोबत काम करणे हा तिच्यासाठी खूप चांगला अनुभव होता. मला वाटते की नील हा एक चांगला आणि काळजी घेणारा व्यक्ती आहे, जो सेटवर सर्वांची काळजी घेतो. नीलसोबत काम करताना मला वैयक्तिकरित्या आनंद झाल्याचे अभिनेत्रीने सांगितले होते. मात्र, कालांतराने नील आणि दीपिकाच्या वाढत्या जवळीकीच्या अफवा धुमसत गेल्या आणि त्यांच्या अफेअरची चर्चाही थांबली.

नील नितीन मुकेशने 1988 मध्ये आलेल्या ‘विजय’ आणि 1989 मध्ये आलेल्या ‘जैसी करनी वैसी भरनी’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. मुख्य अभिनेता म्हणून त्याचा ‘जॉनी गद्दार’ हा पहिलाच चित्रपट होता मात्र तो प्रेक्षकांना फारसा आवडला नाही, पण त्याच्या अभिनयाची लोकांनी नक्कीच प्रशंसा केली. यानंतर तो ‘तेरा क्या होगा जॉनी’, ‘न्यूयॉर्क’, ‘आ देखें जरा’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसला.