नवाजुद्दीन सिद्दीकीच्या एक्सने केले होते त्याच्...

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या एक्सने केले होते त्याच्यावर गंभीर आरोप,जाणून घ्या काय आहे वादग्रस्त प्रकरण (When Nawazuddin Siddiqui’s Ex Made Serious Allegations Against Him, Know This Controversial Story)

बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या आपल्या ‘हड्डी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे, या चित्रपटात अभिनेता वेगळ्या अवतारात दिसणार आहे.  नवाजुद्दीन याने या चित्रपटात एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली आहे. अभिनेत्याचा लूक पाहून चाहते हा चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. नवाजुद्दीन त्याच्या अभिनयामुळे खूप चर्चेत असतो, तसेच त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित वादांमुळेही तो चर्चेत असतो. असेच एकदा अभिनेत्याच्या एक्सने त्याच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे तो चर्चेत आला होता.

अभिनेत्री आणि माजी मॉडेल असलेल्या निहारिका सिंहने मीटूच्या वेळी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीवर अनेक गंभीर आरोप केले होते. ‘मिस लव्हली’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिची नवाजुद्दीन सिद्दीकीशी भेट झाली होती, त्यानंतर दोघांची मैत्री झाली.

अभिनेत्यावर आरोप करताना निहारिका म्हणाली होती की, एकदा नवाज रात्रभर शूटिंग करत राहिला आणि त्याने सकाळी मला मेसेज केला. मेसेजवर त्याने घराजवळ असल्याचे सांगितले. अभिनेत्याचा मेसेज पाहिल्यानंतर निहारिकाने त्याला आपल्या घरी नाश्त्यासाठी बोलावले.

निहारिका पुढे म्हणाली, जेव्हा मी घराचा दरवाजा उघडला तेव्हा नवाजने मला आपल्या मिठीत घेतले. जेव्हा नवाजने मला मिठी मारली तेव्हा मी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो मला सोडण्यास तयार नव्हता.

तिने असेही सांगितले की तिला नवाजसोबत रिलेशनशिपमध्ये यायचे नव्हते पण तेव्हा अभिनेत्याने तिला सांगितले होते की,आपली पत्नी अभिनेत्री किंवा मिस इंडिया असावी असे त्याचे स्वप्न असल्याचे त्याने तिला सांगितले. यानंतर नवाज आणि निहारिका यांनी काही महिने एकमेकांना डेट केले, पण त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि लवकरच दोघांचे ब्रेकअप झाले.

निहारिकाने नवाजवर आरोप केला की, रिलेशनशिपमध्ये आल्यावर काही महिन्यांनी तिला कळले की, अभिनेत्याचे अनेक महिलांसोबत अफेअर होते. त्याने हल्द्वानी येथील एका महिलेशी लग्नही केले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या आत्मचरित्रात आपल्या नात्यांबद्दल अनेक वादग्रस्त गोष्टीही लिहिल्या आहेत.

विशेष म्हणजे, या पुस्तकावरून झालेल्या वादानंतर हे पुस्तक मागे घेण्यात आले. या पुस्तकात नवाजने निहारिकासोबतच्या नात्याबद्दलही तपशीलवार लिहिले होते. त्याच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याचा आगामी चित्रपट ‘हड्डी’ पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.