नवाजुद्दीनने वेटर तरुणीसोबत साजरी केली होती रात...

नवाजुद्दीनने वेटर तरुणीसोबत साजरी केली होती रात्र…. अशी त्याची अनेक अफेअर्स आहेत (When Nawaz Did One Night Stand With Waitress, Know About His other Affairs)

‘ॲन ऑर्डिनरी लाइफ’ या आपल्या चरित्रात्मक पुस्तकात नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या जीवनातली गुपिते उघड केली आहेत. आपल्या मधुर संबंधांवर खुल्लमखुल्ला भाष्य केले आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

आपल्या या आत्मचरित्रात त्याने ‘मिस लवली’ची नायिका निहारिका सिंह ते लेडी वेटरशी घालवलेल्या रात्रीचे किस्से सांगितले आहेत. निहारिकाशी आपले संबंध फक्त दीड वर्ष होते, असं तो सांगतो.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

न्यूयॉर्क मधील एका कॅफेमध्ये आपण गेलो असता, तेथील वेटर तरुणीने ओळखले. अन्‌ आम्ही एक रात्र मजेत घालवली, असं नवाज सांगतो. शिवाय न्यू जर्सी येथील सुझैन नामक तरुणीशी आपण लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिलो, असल्याची कबुली त्याने दिली. तो तिच्याशी लग्न करू इच्छित होता. पण ती नव्हती…

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

नवाजुद्दीनचे पहिले प्रेमप्रकरण सुनीता राजवरशी होते. ती पण अभिनेत्री असून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये दोघांनी एकत्र शिक्षण घेतले होते.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

आपल्या आत्मकथेत तो लिहितो की, सुनीताशी ब्रेकअप झाल्यावर तो आत्महत्या करायला निघाला होता. पण नंतर अंजलीशी लग्न केलं. दोघांना एक मुलगा –मुलगी आहे. या संसारातही वितुष्ट आलं होतं. पण दोघांनी जुळवून घेतलं. आता दोघेही सुखात आहेत.