संघर्षाच्या काळात नागिन फेम सुरभि ज्योतिला ऐकाव...

संघर्षाच्या काळात नागिन फेम सुरभि ज्योतिला ऐकावे लागले होते लोकांचे टोमणे (When ‘Naagin’ Surbhi Jyoti had to Listen People’s Taunts During her Struggle Days, Actress Expressed Her Pain)

टीव्ही इंडस्ट्रीत काम करणे हे अनेकांचे स्वप्न असते. काहींचे ते स्वप्न पूर्ण देखील होते. पण इंडस्ट्रीत तग धरुन राहणे खूप कठिण आहे. इंडस्ट्रीत असे कलाकार आहेत ज्यांनी मालिकांमार्फत पदार्पण तर केले पण तिथे टिकून राहण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. त्यातीलच एक म्हणजे नागिन फेम अभिनेत्री सुरभि ज्योति. एका मुलाखतीत सुरभिने आपल्या संघर्षाच्या काळात तिला कसे लोकांचे टोमणे ऐकावे लागले होते ते सांगितले होते.

सुरभि ज्योति ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. एकता कपूरची नागिन बनून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या सुरभि ज्योतिने ‘कुबूल है’ या टीव्ही मालिकेमधून टीव्ही इंडस्ट्रीत प्रवेश केला. या मालिकेत तिने झोयाची भूमिका साकारुन लोकांची मने जिंकली.

सुरभी ज्योतीने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तिचा पहिला शो हिट झाला तेव्हा तिचे कौतुक करण्याऐवजी लोक तिला टोमणे मारत होते. सुरभिने पुढे सांगितले होते की, जेव्हा तुम्हाला सहज यश मिळते तेव्हा ही गोष्ट ना लोकांना कधीच पचत नाही.

पुढे मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले होते की, सहज यश मिळाल्यानंतर तुम्हाला तुमच्या सहकलाकारांचे कमेंट्सही ऐकायला मिळतात. काहीजण तर म्हणायचे की, कमी फीमध्ये नवीन मुली आणतात, त्यांच्याकडे टॅलेण्टपण नसते. सुरभि म्हणाली की अशा कमेंट करणाऱ्यांबद्दल मला खूप वाईट वाटते, असे लोक किती निराश असतात.

कामावरुन टोमणे मारण्याबद्दल सुरभि म्हणाली, की ती नकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्षच देत नाही. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती सर्वात शेवटी एकता कपूरचा हिट शो नागिन 3 मध्ये दिसली होती. या मालिकेत तिने बेला हे पात्र साकारले होते.