‘माझ्या मैत्रिणी घरी आल्या की अमितजी चिडत...

‘माझ्या मैत्रिणी घरी आल्या की अमितजी चिडतात’- जया बच्चनची लाडिक तक्रार : म्हणते – ‘आता त्यांचे वय झालंय्’ (‘When my friends come home, Amit ji gets angry’- Jaya Bachchan makes interesting revelation about Big B, Says- ‘He has become old now’)

अमिताभ बच्चन आणि जया हे बॉलिवूडचे सुखी जोडपे आहे. मात्र चाहत्यांना त्यांच्या संसारात डोकवायला आवडते. बीग बी देखील अधूनमधून आपल्या कौटुंबिक गोष्टी सोशल मीडियावर प्रसारित करून त्यांची भूक भागवतात. हल्लीच मात्र जया बच्चन यांनी आपल्या नवऱ्याबद्दल असं काही वक्तव्य केलं की, चाहते चकितच झाले. माझ्या मैत्रिणी घरी आलेल्या, त्यांना आवडत नाही – असं जयाने सांगितलं.

आपली नात नव्या नवेली नंदा हिच्या पॉडकॉस्ट शो मध्ये त्या बोलत होत्या. नव्या आणि आपली मुलगी श्वेता नंदा यांच्याशी बोलताना त्यांनी अमितजींच्या विचित्र वागण्याचा खुलासा केला.

सात मैत्रिणींचा आपला एक ग्रुप आहे. त्याला ते ‘सात सहेली’ असे बोलतात. या मैत्रिणी घरी येतात तेव्हा अभिषेक बच्चन आणि नात अगस्त्य नंदा आनंदित होतात. पण बिग बींना त्या आलेल्या अजिबात आवडत नाही. जयाने नव्याला पुढे सांगितलं की, ‘त्यांना बघून तुझे आजोबा चिडतात, रागावतात. अन्‌ तिथून निघून जातात. ते गेले की, माझ्या मैत्रिणींना पण बरे वाटते.’

आपला हा मैत्रिणींचा ग्रुप गेली चार दशके आहे. त्या सगळ्या अमितजींना चार दशकांपासून ओळखतात, असं सांगून जयाने लाडिक तक्रार केली की, ‘अमितजी आता बदलले आहेत. ते म्हातारे झाले आहेत. मी मात्र तशी नाही. मी १८ वर्षांच्या तरुणांशी देखील व्यवस्थित बोलू शकते.’

”कौन बनेगा करोडपती’ चा १४ वा भाग आणि अन्य काही चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन व्यस्त आहेत. येत्या ११ ऑक्टोबरला त्यांचा ८० वा वाढदिवस आहे. त्यासाठी बच्चन कुटुंबिय काही खास कार्यक्रमांची आखणी करत आहेत.