पुरुष असूनही मोहित मलिक पडणार होता कास्टिंग काउ...

पुरुष असूनही मोहित मलिक पडणार होता कास्टिंग काउचला बळी,पण प्रसंगावधान राखून त्याने तिथून काढला पळ(When Mohit Malik Narrowly Escaped from Being a Victim of Casting Couch, Actor Said- It Was the Worst Experience of My Life)

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता मोहित मलिकने स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मूळचा दिल्लीचा असलेला मोहित मलिक अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आला, पण इथून पुढे अभिनय क्षेत्रात प्रवेश करेपर्यंतचा त्याचा प्रवास खूप खडतर होता. मात्र, वाटेत आलेल्या अडचणींमुळे मोहितने कधीच हार मानली नाही. संघर्षाच्या दिवसांमध्ये, अभिनेता कास्टिंग काउचला बळी पडण्यापासून थोडक्यात बचावला होता. मोहितच्या मते तो त्याच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट अनुभव होता.

 मोहित मलिकचे नाव टीव्हीच्या यशस्वी अभिनेत्यांपैकी एक असले तरी एक काळ असा होता जेव्हा तो पुरुष असूनही त्याला कास्टिंग काउचसारख्या गोष्टीला सामोरे जावे लागले होते. सहसा कास्टिंग काउचसारख्या घटना अभिनेत्रींसोबत घडतात, मात्र काही अभिनेत्यांनाही या समस्येचा सामना करावा लागला आहे. या कलाकारांमध्ये मोहित मलिकच्या नावाचाही समावेश आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत मोहित मलिकने त्याच्यासोबत घडलेल्या या घटनेबद्दल सांगितले. तो म्हणाला, जेव्हा तो दिल्लीहून मुंबईत अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन आला होता, तेव्हा संघर्षाच्या दिवसात मला खूप काही सहन करावे लागले होते. मी अनेक शोमध्ये अभिनय केला, पण एकदा मला एका चित्रपटासाठी फोन आला आणि तिथे पोहोचल्यावर जो अनुभव आला तो एका भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हता, कारण तिथे मी कास्टिंग काउचला बळी पडता पडता वाचलेलो.

मोहित मलिकने सांगितले की, मला एकदा एका चित्रपटासाठी ऑफिसमध्ये बोलावण्यात आले होते, जिथे माझ्यासोबत काहीतरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु मी हिंमत दाखवली आणि तेथून पळ काढला. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, तेथे एक छोटीशी चर्चा झाली, परंतु मी एक अतिशय व्यावहारिक आणि सजग व्यक्ती असल्याने, मला वेळीच परिस्थितीची जाणीव झाली आणि आपल्यासोबत काहीतरी चुकीचे होणार आहे असे वाटले म्हणून मी तिथून पळून गेलो.

मोहित मलिक गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर सक्रिय असून त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मोहितने ‘बनू में तेरी दुल्हन’, ‘डोली अरमान की’ आणि ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या मालिकांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाने मोहितने प्रेक्षकांची मने जिंकली. आता मोहित मलिक ‘खतरों के खिलाडी 12’ मध्ये खेळताना दिसत आहे.