तारक मेहता…मधल्या बबिताला एका व्यक्तीने आ...

तारक मेहता…मधल्या बबिताला एका व्यक्तीने आक्षेपार्ह प्रश्न विचारला, त्यावर मुनमुनने उत्तर देऊन केली बोलती बंद (When Man Asked an Objectionable Question to ‘Babita Ji’ of ‘Taarak Mehta’, Know Munmun Dutta’s Reaction)

टीव्हीवरील प्रसिद्ध विनोदी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या 14 वर्षांपासून सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. वर्षानुवर्षे चालणाऱ्या या मालिकेशी अनेक कलाकार जोडले गेले आहेत. तर अनेक जुन्या कलाकारांनी या मालिकेचा निरोप घेतला आहे. या मालिकेतील पात्र इतकी लोकप्रिय आहेत की प्रेक्षक त्यांना त्यांच्या खऱ्या नावाऐवजी मालिकेतील नावानेच ओळखतात. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहेत. अभिनेत्री मुनमुन दत्ताबद्दल सांगायचे तर तिने तारक मेहतामध्ये बबिता ही भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, त्यामुळे तिची फॅन फॉलोइंग जबरदस्त तयार झाली आहे.

बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा आपले लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या त्या फोटोंना अनेकदा  चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळते तर दुसरीकडे अनेकजण अश्लील कमेंट्सही करतात. सहसा, बरेच सेलिब्रिटी फोटोंवर केलेल्या आक्षेपार्ह कमेंट्सकडे दुर्लक्ष करणे पसंत करतात, परंतु या प्रकरणात, मुनमुन दत्ता त्यांच्यापेक्षा थोडी वेगळी आहे.

इंस्टाग्रामवर मुनमुन दत्ताच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यामुळेच तिचे फोटो आणि व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल होतात. मुनमुन दत्ताच्या फोटोंचे लोक कौतुक करताना दिसत असले तरी नुकतेच तिला एका व्यक्तीने आक्षेपार्ह प्रश्न विचारला, ज्यामुळे अभिनेत्रीचा राग अनावर झाला. त्या प्रश्नावर अभिनेत्रीने असे काही उत्तर दिले की त्या व्यक्तीची बोलतीच बंद झाली.

अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी तिचा भारतीय पोशाखातील फोटो शेअर केला, त्या फोटोला लाखो लोकांनी लाईक केले आणि कमेंट करून प्रेमही व्यक्त केले. या सर्वांमध्ये एक अशी व्यक्ती होती, जिने कमेंट करून अभिनेत्रीला आक्षेपार्ह प्रश्न विचारला. कमेंटमध्ये त्या व्यक्तीने अभिनेत्रीला एका रात्रीची किंमत विचारली.

एका व्यक्तीने कमेंट करून एका रात्रीची किंमत विचारल्यावर मुनमुन संतापली. तिच्या जागी दुसरे कोणी असते तर त्या व्यक्तीने त्याकडे दुर्लक्ष केले असते, पण अभिनेत्रीने गैरवर्तन सहन न करता त्या व्यक्तीला चोख प्रत्युत्तर दिले. अभिनेत्रीनेही कमेंटद्वारे त्या व्यक्तीला असे उत्तर दिले की तिची बोलतीच थांबली.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम