मलायका अरोराच्या मुलाने सलमान खानवर हात उगारला;...
मलायका अरोराच्या मुलाने सलमान खानवर हात उगारला; तेव्हा अरबाज खानने त्याला आवरले (When Malaika Arora’s Son Started Hitting Salman Khan, Arbaz Khan Controlled Him)

‘अंतिम : द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटामुळे सलमान खान चांगलाच चर्चेत आला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद लाभला आहे. सलमान सध्या अशा शिखरावर आहे की, लोक त्याला इज्जत देतात, अन् त्याला घाबरतात देखील. पण तुम्हाला माहीत आहे का, की या दबंग चाचाची, त्याच्या पुतण्याने एकदा जाम पिटाई केली होती. हा किस्सा तुम्ही पण एन्जॉय कराल…

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
आपला पुतण्या अरहानने केलेल्या या मारपिटीचा किस्सा, स्वतः सलमान खानने आपल्या चित्रपटाच्या प्रसिद्धी दरम्यान सांगितला आहे. झालं असं होतं की, ‘दबंग’ मध्ये सलमानसह त्याचा भाऊ अरबाज खान होता. त्या दोघांमध्ये पडद्यावर मारामारीचे प्रसंग दिसले होते.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
अरबाजने या चित्रपटात खलनायकाची भूमिका केली होती. त्यामुळे नायक सलमान त्याची पिटाई करतो, अशी दृश्ये चित्रपटात होती.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
अरबाजचा मुलगा अरहान तेव्हा ८ वर्षांचा होता. त्याने चित्रपट पाहिला अन् सलमान-अरबाजची मारामारी बघून रडू लागला. त्या निष्पाप मुलाला वाटलं की, आपला काका, पिताजींची खरोखरीच धुलाई करतो आहे. ते दृश्य पाहून संपताच अरहान सलमान जवळ आला आणि त्याने सलमानला दे दणादण मारायला सुरुवात केली.

तू माझ्या पप्पांना मारलंस, म्हणून मला राग आलाय् असं अरहानने, काकाला रडत रडत सांगितलं. त्यावर ही केवळ ॲक्टिंग आहे बेटा, अशी सलमानने समजूत घातली. तरी अरहानला पटेना. अखेरीस अरबाज खानने त्याला जवळ घेतले आणि शांत केले.