मलायका अरोराने, सलमान खानबाबत केले होते धक्कादा...

मलायका अरोराने, सलमान खानबाबत केले होते धक्कादायक विधान (When Malaika Arora gave a Shocking Statement about Salman Khan, Said This About Her Career)

अरबाज खान, अर्थात्‌ सलमान खानचा भाऊ, याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा, अर्जुन कपूरशी संबंध ठेवून आहे. वेगवेगळ्या कारणांनी मलायका-अर्जुनची जोडी सोशल मीडिया गाजवत असते. मात्र मलायका बाबत असं बोललं जातं की, तिचं करिअर घडविण्यासाठी खान फॅमिलीचा मोठा हात आहे. पण मलायकाने ही बाब साफ खोडून लावली आहे. इतकंच नव्हे तर सलमान खान बाबत धक्कादायक विधान केलं आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

मलायकाने ‘छैंया छैंया’ या गाण्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अन्‌ बघता बघता तिचं करिअर या क्षेत्रात घडत गेलं. पण यामध्ये खान कुटुंबियाची मोठी मदत झाली, हे मात्र ती नाकारते आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अरबाज खानशी घटस्फोट घेण्यापूर्वी मलायकाने खान परिवाराने निर्माण केलेल्या काही चित्रपटांमधून आयटम डान्स केले. ते चांगलेच लोकप्रिय झाले होते. पण या आयटम गर्लने २०१७ साली सलमान खानचा भाऊ अरबाज खानशी घटस्फोट घेतला.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

प्रसिद्धीचा हव्यास असलेल्या राखी सावंतने एकदा असे वक्तव्य केले की, सलमान खानशी संबंध आहेत म्हणून मलायकाला आयटम गर्ल म्हटले जात नाही. हे ऐकून मलायकाच्या अंगाचा तीळपापड झाला. अन्‌ ती राखीवर नाराज झाली.

राखी सावंतच्या वक्तव्यावर भडकलेली मलायका एका मुलाखतीत बोलती झाली की, असं असेल तर मग मी सलमानच्या प्रत्येक चित्रपटात असायला हवे. चित्रपटातच काय, सलमानच्या चित्रपटातील प्रत्येक गाण्यात मी दिसली असते. पुढे मलायकाने स्पष्टपणे सांगितलं की, सलमान खानने मला अजिबात पुढे आणलेलं नाही. अन्‌ माझं करिअर घडविण्यात त्याचा काहीही हात नाहिये. मी स्वबळावर या स्थानावर पोहचले आहे.

बघायला गेलं तर तेव्हा मिडियामध्ये अशा बातम्या पसरल्या होत्या की, अरबाज खानने मलायकाचे करिअर घडविण्यात काहीच मदत केली नाही, म्हणून ती नाराज होती.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यावर मलायकाची जीवनात चांगलीच प्रगती झाली आहे, हे सांगायला नकोच. शिवाय ती अर्जुन कपूर सोबत आपलं प्रेमजीवन आनंदाने व्यतीत करते आहे.