निया शर्मा आली पुन्हा मूळ पदावर : सादर केले बोल...

निया शर्मा आली पुन्हा मूळ पदावर : सादर केले बोल्ड फोटो (‘When Life Gives You Curves, Flaunt Them…’ Says Nia Sharma As She Shares New Bold Pictures)

निया शर्मा अधूनमधून आपले बोल्ड आणि हॉट फोटो प्रसारित करून इंटरनेटचे तापमान वाढवत असते. सध्या ती ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमात आपली नृत्यकला आणि नखरे दाखवते आहे.

थोड्या विश्रांतीनंतर नियाची गाडी पुन्हा मूळ पदावर आली आहे. कारण तिने इन्स्टाग्रामवर आपले नवे बोल्ड फोटो सादर केले आहेत. यामध्ये तिने काळ्या रंगाची स्पोर्टस्‌ ब्रा आणि त्याच रंगाचा बॉटम घातला आहे. त्यातून तिच्या शरीराचा बांक दिसतो आहे.

फोटोंवर नियाने लिहिलेल्या मजकुरात असं म्हटलं आहे की, ‘वळसेदार शरीर आपल्याकडे आहे तर त्याचे प्रदर्शन करावे.’ चाहते तिची तारीफ करत आहेत. म्हणताहेत, ‘तू झोकदार आहेस… सेक्सी एंजल आहेस’. आणखी काही म्हणताहेत, ‘स्वीट,’ ‘हॉट’.

आपले शरीर आणि स्टाईल यावर वेगवेगळे प्रयोग करताना निया कचरत नाही. मेकअप आणि केशभूषा याबाबत देखील तिचे धाडसी प्रयोग चालू असतात. निया शर्माने आपल्या इन्स्टा स्टोरीवर जे काही नवे हॉट फोटो सादर केले आहेत, त्यात ती फारच छान दिसते आहे.