दृश्याचा एक भाग चित्रित करून कतरिना कैफला चित्र...

दृश्याचा एक भाग चित्रित करून कतरिना कैफला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं… करिअर संपलं की काय, अशी तिची धारणा झाली… (When Katrina Kaif Was Removed From The Film After Giving A Shot, It Was Thought That Her Career Was Over)

बॉलिवूडच्या ग्लॅमरस्‌ आणि नामांकित तारकांच्या यादीत कतरिना कैफचं नाव ठळक आहे. मात्र ही लोकप्रियता व ऐश्वर्य मिळविण्यासाठी तिला बराच संघर्ष करावा लागला होता. भूमिका नाकारण्यात आल्या. टीका झाली. एकदा तर असं घडलं की, चित्रपटातील दृश्यामधील एक भाग (शॉट) चित्रित झाल्यानंतर तिला त्यातून काढूनच टाकण्यात आलं.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

एका मुलाखतीत खुद्द कतरिनानेच यासंबंधी सांगितलं. ‘साया’ या चित्रपटाचा एक शॉट देऊन झाल्यावर तिला रजा देण्यात आली. तुझ्यामध्ये चांगले गुण नाहीत, तू कधीच अभिनेत्री होऊ शकणार नाहीस, असं सांगून तिला काढून टाकण्यात आलं. बिचारी कतरिना रड रड रडली.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

अनुराग बसुने हा चित्रपट बनवला होता. त्यात जॉन अब्राहम व तारा शर्मा होते. त्यातून मला काढून टाकल्यावर मला वाटलं की, आयुष्य संपलं. माझं करिअर थांबलं, अशी माझी भावना झाली असल्याचं कतरिनाने सांगितलं.

या मुलाखतीत कतरिनाने पुढे असंही सांगितलं की, “प्रत्येक अभिनेत्याला सुरुवातीला नकारघंटा ऐकावीच लागते. मग आपण कारण शोधू लागतो की, आपण अभिनेता कसे होणार? मला तर लोकांनी तोंडावर सांगितले की, तू कधीच अभिनेत्री होणार नाहीस. तुझ्या अंगी चांगले कलागुणच नाहीत. तेव्हा मी रडले होते. पण आपण मेहनत केली पाहिजे, हे माझ्या लक्षात आलं.”

२००३ साली आलेल्या ‘बूम’ या चित्रपटातून कतरिनाचं करिअर सुरू झालं. हा चित्रपट अयशस्वी ठरला. नंतर तिने राजनिती, टायगर जिंदा है, जब तक हे जान, झिरो, नमस्ते लंदन, अजब प्रेम की गजब कहानी अशा चित्रपटातून तिने कामे केली. अन्‌ यश मिळवलं.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

‘जी ले जरा’ हा तिचा आगामी चित्रपट आहे. तर ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘फोन भूत’ या चित्रपटाची ती नायिका आहे.